लोणंद प्रतिनिधी
दि. ०९
लोणंद नजीक असलेल्या बाळू पाटलाची वाडी येथील युवक सुरज बापूराव धायगुडे वय २३ याचा आरोपी पैकी एकाच्या बायकोला मेसेज करण्याच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक ०८ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास राघु धोंडीबा धायगुडे यांचा पुतण्या सुरज बापुराव धायगुडे वय २३ वर्षे रा.बाळुपाटलाचीवाडी ता.खंडाळा यास आरोपी रोहित धनावडे याने त्यांचे यामाहा मोटार सायकलवर बसवुन समाधान ढाबा लोणंद ता खंडाळा येथे नेवुन रोहित धनावडे, राकेश माने, गणेश भालेराव, समाधान ढाब्याचे मालक मंगेश (आबा) क्षीरसागर,व त्याचा भाऊ राजेश क्षीरसागर, कामगार योगेश कांबळे, इतर 7 ते 8 अनोळखी इसमानी राजेश क्षीरसागरच्या बायकोला मेसेज का करतो, या कारणावरुन सुरज धायगुडे यास चिडुन लाकडी दांडक्याने त्याचे हातावर, पायावर, पोटावर मारहान करुन त्यास दिनांक ०९ रोजी पहाटे ३ वाजण्याचे सुमारास लोणंद एस.टी.स्टैंड समोर आणुण टाकले . या मारहाणीत सुरज धायगुडे यास उपचारासाठी नवले हॉस्पीटल, पुणे येथे नेत असताना तो मयत झाला . याप्रकरणी त्याचे चुलते राघु धोंडीबा धायगुडे यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
सदर खुनाची घटना समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री तानाजी बरडे यांनी गुन्हयाचे
ठिकाणी भेट देवुन लोणंद पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सचिन राऊळ, गणेश माने यांना गुन्हयातील आरोपीचा शोध घेवुन त्यांना अटक करण्याच्या सुचना दिल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, गणेश माने, पोहवा महेश सपकाळ, दत्ता दिघे, ज्ञानेश्वर मुळीक, विठ्ठल काळे, संतोष नाळे, श्रीनाथ कदम, फैयाज शेख, शशीकांत गार्डी हे तपास करीत आहे.