महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुधाला दरवाढ मिळावी म्हणून , राज्यातील आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन केले , या सरकारमध्ये तालुक्यातील लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे राज्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधासाठी हे आंदोलन गावागावातील पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी हातात घेतले .आज एक ऑगस्ट रोजी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना तशा सक्त सूचना पाटील यांनी केल्या होत्या.
परंतु रेडणी गाव , याला अपवाद ठरले . या गावातील भाजपाचे पदाधिकारी रेडणी गावातच काय तर ते तालुक्याच्या ठिकाणी सुध्दा फिरकले नाहीत .
रेडणी हे गाव भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो , या गावचे सरपंच भीमराव काळे,सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वासराव काळकुटे , निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक चंद्रकांत भोसले , स्वामी समर्थ सोसायटीचे संचालक अमरदीप काळकुटे , इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन भाऊसाहेब काळकुटे हे मातब्बर पदाधिकारी फिरकलेच नाहीत , त्यांना आज आंदोलन आहे व आपल्या नेत्याने आंदोलनात सहभागी होण्याचा दिलेला आदेशाचा विसर त्यांना पडला
इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पक्ष यांच्यात जोरदार राजकिय संघर्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व विद्यमान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तर भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व माजी कॅबिनेट मंत्री हर्षवर्धन पाटील करीत आहेत , तालुक्यातील तिन्ही खाजगी दूध संघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या मालकीचे आहेत , त्यामुळेच या आंदोलनाला खूपच महत्व होते , राज्यमंत्री भरणे यांच्याशी असलेल्या वैयक्तिक संबंधामुळे काही पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला नसल्याची चर्चा तालुक्यातील गावा-गावात आहे .






























