महाराष्ट्र न्यूज लोणंद प्रतिनिधी : बिलकीस शेख
अखंड हिंदुस्थान चे आराध्यदैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज व महाराष्ट्राचा स्वाभिमान श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि युवराज छत्रपती संभाजीराजे यांचे बद्दल प्रकाश आंबेडकर यांनी अपशब्द वापरलेबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिरवळ येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करून प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला आणि यानंतर शिरवळ पोलीस स्टेशन येथे निवेदन येण्यात आले.
यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अनुप सुर्यवंशी, भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश युवक सहसंपर्कप्रमुख निखिल झगडे,भाजपा युवा मोर्चा खंडाळा तालुका सरचिटणीस जितेंद्र मगर,भाजपा युवा मोर्चा शिरवळ शहर सरचिटणीस गौरव घोलप, विद्यार्थी आघाडी शिरवळ शहर संघटक हितेश जाधव, अशोक वीर व कार्यकर्ते उपस्थित होते.