महाराष्ट्र न्यूज बारामती प्रतिनिधी /सुनिल निंबाळकर :
बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ ग्रामपंचायतीमध्ये बारामती तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष राहुल वाबळे यांच्या गटाने विजयाची हॅट्रीक मिळवली आहे . तालुक्यातील 52 ग्रामपंचायती पैकी चुरशीची ठरलेली ही देऊळगावची निवडणूक होती. या वेळी दोन्ही बाजूच्या गटामध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत दोन्ही पॅनल होते. यामध्ये अध्यक्ष गट व विरोधात बारामती तालुका दूध संघाचे संचालक सुरेश रसाळ व बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक अंकुश रसाळ असे संघर्षमय पॅनल होते. तसेच निवडणुकी मध्ये दोन्ही गट समसमान होऊन अपक्ष विजयी उमेदवाराच्या खांद्यावर सर्व भार होता परंतु गावामध्ये अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी नंतर युवक अध्यक्षांच्या गटाने योग्य वेळी सर्व धुरा हातामध्ये घेऊन आपली तीन पंचवार्षिकची परंपरा अबादीत ठेवली आहे.
2010 ते 2015 या पंचवार्षिक निवडणूक लागली आणि त्यावेळी गावामधील राहुल वाबळे, मकरंद वाबळे, शिरीष वाबळे, सुनिल पवार, सागर वाबळे, अजम इनामदार, उमेश वाबळे, हनुमंत वाबळे, ईश्वर वाबळे, हनुमंत बागल, संभाजी वाबळे, अनिल वाबळे, दीपक वाबळे, राजेंद्र खंडागळे, अमोल वाबळे, आदिनाथ वाबळे, शेरखान इनामदार, वसंत वाबळे, मन्सूर इनामदार, प्रितम वाबळे आणि गावातील इतर युवक व जेष्ठ मंडळी आणि सर्व सामान्य नागरिकांना विश्वासात घेऊन एकत्र येऊन सर्वांनी राहुल वाबळे यांच्या नेतृत्वाखाली नवक्रांती ग्रामविकास आघाडी या नावाने देशाचे नेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब, बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार सौ.सुप्रियाताई सुळे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शना खाली निवडणूक लढवायची ठरवली. त्यावेळी अंकुश रसाळ आणि सुरेश रसाळ यांनी सुध्दा आपले स्वतंत्र पॅनल टाकून गावामध्ये तिरंगी लढत झाली होती परंतु तेव्हा राहुल वाबळे यांच्या पॅनलला पाच जागा मिळवत यश मिळाले. पाच वर्षे गावचा कारभार करत असताना बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मा. संभाजी नाना होळकर या कालावधीत पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती होते त्यांनी राहुल वाबळे यांना देऊळगाव रसाळ चा विकास करण्यासाठी वेळोवेळी मदत केली.
2015 ते 2020 च्या पंचवार्षिक निवडणुकीत मात्र राहुल वाबळे यांच्या विरोधात बारामती खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अंकुश रसाळ आणि देऊळगाव चे उपसरपंच सुरेश रसाळ यांनी एकत्र येऊन राहुल वाबळे यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न केला परंतु पंधरा वर्ष विरोधात निवडणूक लढणारे अंकुश रसाळ आणि सुरेश रसाळ एकत्र आलेने तालुक्यातील आणि गावातील अनेकांच्या भुवया उंचावल्या म्हणून त्यावेळचे बारामती पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय लोंढे आणि युवा कार्यकर्ते विजय भिसे यांनी राहुल वाबळे यांना बिनशर्त पाठिंबा देत निर्णायक महत्त्वपूर्ण भूमिके मूळे या निवडणुकीत राहुल वाबळे यांच्या गटाला सहा जागा व विरोधी गटाला फक्त तीन जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे यांचे नाव संपूर्ण तालुक्याला परिचित झाले अशातच बारामती दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक लागली आणि राहुल वाबळे यांनी संचालक पदाची मागणी केली परंतु युवकांचे संघटन कौशल्य बघून महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांनी अचानक राहुल वाबळे यांच्या गळ्यात बारामती तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पदाची माळ टाकली. आणि अश्या पद्धतीने वाबळे यांना तालुका पातळीवरचे पाहिले पद मिळाले. त्या नंतर त्यांनी तालुक्यात युवकांचे संघटन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत असतात आणि त्या नंतर बारामती तालुक्यात राहुल वाबळे हे मा. अजितदादा पवार यांचे विश्वासु म्हणून ओळखले जातात.
या वेळी 2021 च्या पंचवार्षिक निवडणुकीत आनंद रसाळ, शैलेश रसाळ, बबन खंडागळे, जैनुद्दीन (फौजी) इनामदार, रोहिदास भिसे, बाळासो वाबळे, ज्ञानेश्वर वाबळे, हनुमंत सपकाळ, नितीन सपकाळ, मेनिनाथ उदावंत, आण्णा खोरे यांनी पण राहुल वाबळे यांच्या नवक्रांती ग्रामविकास आघाडीला महत्वाच्या क्षणी साथ दिली यामुळे देऊळगावच्या सरपंच पदी नवक्रांती ग्रामविकास आघाडीच्या सौ. वैशाली वसंत वाबळे उपसरपंच पदी चि.दत्तात्रय माधवराव वाबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे तसेच बहुमत सदस्यांसाठी
मनीषा संतोष वाबळे, सल्लाउद्दीन गफूरभाई इनामदार तसेच अपक्ष उमेदवार सुनंदा मेनिनाथ उदावंत यांनी आपले निर्णायक मत युवक अध्यक्ष याच्या गटाला देऊन राहुल वाबळे यांनी सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत आपले वर्चस्व राखले.
१) सुनंदा मेनिनाथ उदावंत
अपक्ष उमेदवार – मी बिनविरोध निवडून आले मुळे मी गावच्या विकासासाठी आणि गावामध्ये पाणी योजना राबविण्याच्या विषयावर माझे मत राहुल वाबळे यांच्या नवक्रांती ग्रामविकास आघाडीला दिले.
२) राहुल वाबळे-
निवडणूक होईपर्यंत गट तट मर्यादित असतात. आम्ही गेली दहा वर्ष मतभेदाचे राजकारण न करता विकासाच्या जोरावर राजकारण करत आहे. येणाऱ्या काळात गट तट विसरून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा सर्वांगीण विकास करणार आहे.
तसेच गावातील सर्व जनतेने 15 वर्ष मला विजयचा गुलाल लावून हॅट्रिक मिळवून दिली त्याबद्दल सर्व जेष्ठ, महिला, युवक आणि सर्व बंधू भगिनींचे मी कायम ऋणी राहील.
३) उपसरपंच-
गावातील सर्व सर्वसामान्य जनतेने जो विश्वास ठेवला आहे तो विश्वास सार्थ करून दाखवू..






















