फलटण ( प्रतिनिधी )गेली दोन महिन्यांपासून शहरातील स्वामी विवेकांनद नगर , अनंत मंगल कार्यालय , महाराजा मंगल कार्यालय या भागात मोपेड मोटार सायकल वरून जाणा – या महीला व मुलीचे हातातील पर्स , अथवा गाडीचे बास्केट , हॅण्डेलला लावलेली पर्स उचलून व जबरदस्तीने हिसकावून जाणाऱ्या एका आरोपीस व त्याकडून मुद्देमाल विकत घेणाऱ्या तीन जणांना अटक करून नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात शहर पोलिसांना यश मिळाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एक अनोळखी २० ते २२ वर्षे वयाचा अंगाने सडपातळ असणारा चोरटा मोटार सायकल वरून शहरातील स्वामी विवेकांनद नगर, अनंत मंगल कार्यालय, महाराजा मंगल कार्यालय या भागात महिला व मुली यांचा पाठलाग करीत त्यांचे पाठोपाठ मोटार सायकल चालवित जात आजुन बाजुला तसेच मागे पुढे कोण नाही हे पाहून संधी मिळताच महीला व मुलीचे हातातील पर्स, अथवा गाडीचे बास्केट, हॅण्डेलला लावलेली पर्स उचलून व जबरदस्तीने हिसकावून घेऊन जात असे याशिवाय रस्त्याने मोबाईल फोनवर बोलत जाणा-या महिला व मुली यांचे हातातील मोबाईल जबरदस्तीने ओढून पोबारा करीत होता.
शहरातील सदरच्या चो-या तो साधारण पणे आठ दिवसांचे फरकाने सातत्याने करीत होता. फलटण शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून सुमारे आठ ते दहा दिवसापासून दररोज सायंकाळी ६ ते ८.३० यावेळेत वरील भागात रिक्षा मध्ये स्पिकर लावून विशेषत : महिला व मुली वर्गामध्ये एक अनोळखी चोरटा वय अंदाजे २० ते २२ वर्षे वयाचा महीलाचे जवळील बॅग , पर्स , मोबाईल तसेच गळयातील मंगळसुत्र व गंठण जबरदस्तीने हिसकावून चोरून नेत असले बाबत सर्वानी सावधान राहून दक्षता घ्यावी तसेच सदर बाबत त्यांनी आपले स्वत : चा मोबाईल नंबर व पोलीस ठाणेचा नंबर देवून असा काही प्रकार घडलेस किंवा कोणाला काही माहीती मिळाल्यास त्यांचे नाव जाहीर न करता गोपनीय ठेवण्यात येईल या अटीवर अनाऊसमेंट करून जनजागृती करुन जाहीर आव्हान करण्यात आलेले होते.
सदर मोटार सायकल वरील अज्ञात चोरटयांची माहीती प्राप्त करून दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ रोजी महिला व मुलींना टार्गेट करून , गाडीचे बास्केट मध्ये ठेवलेली पर्स तसेच मोबाईलवर बोलत असताना व हॅण्डलला लावलेली पर्स उचलून व मोबाईल हिसकावून घेवून जाणारा अज्ञात चोरटा हा मोटार सायकल क्रमांक एम.एच .११ सी एफ ७२५९ वरून त्याच पध्दतीने गुन्हे करण्यासाठी येत असल्याची माहीती प्राप्त झाल्याने फलटण शहर पोलीस ठाण्यातील फलटण शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एन आर गायकवाड, सहाय्यक फौजदार एस.एन.भोईटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही.पी.ठाकूर, पोलीस हेड कॉन्स्टेबल आर.एस.भोईर, पोलीस नाईक एस.डी.सुळ , पोलीस नाईक एन.डी.चतुरे , पोलीस नाईक एस.ए.तांबे, पोलीस नाईक लावंड, पोलीस शिपाई अच्युत जगताप यांनी महाराजा मंगल कार्यालय लक्ष्मीनगर फलटण येथे सापळा लावला असता माहीतील वर्णनाप्रमाणे व मोटार सायकल वरील संशयीत अज्ञात चोरटा मिळून आल्याने त्यांस मोठया शिताफीने पकडून त्यांचे नाव विचारले असता त्याने त्यांचे नांव सुरेश रमेश कदम (वय २२ वर्षे मुळ राहणार धुळदेव सद्या राहणार भ्राम्हणगल्ली पाटणे यांचे चाळ फलटण ता फलटण) असे सांगितले.
आरोपी सुरेश रमेश कदम यास ताब्यात घेवून तपास केला असता त्याने सदर कालावधीत फलटण शहरातील लक्ष्मीनगर , संजीवराजे नगर , गोळीबार मैदान , स्वामी विवेकांनद नगर , अनंत मंगल कार्यालय या भागात एकूण मालमत्तेचे ९ गुन्हे त्यापैकी ३ जबरी चोरी व ६ चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आलेले असून त्यांचे कब्जातून ०२ लॅपटॉप तसेच एकूण ११ मोबाईल हॅण्डसेट व एक मोटार सायकल तसेच रोख रक्कमेसह एकूण २ लाख २४ हजार ८०० रूपये किंमतीचा माल हस्तगत करणेत आला आहे .
चोरीचा मोबाईल हॅण्डसेट चोरीचा लॅपटॉप घेणारे तीन आरोपीना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आशिष हेमंत अहिवळे (वय २० वर्षे रा सोमंथळी ता फलटण), मयुर संजय साळवे (वय २० वर्षे) व सौरभ संभाजी जाधव (वय २० वर्षे दोन्ही रा . सुरवडी ता फलटण) यांना अटक करणेत आलेली आहे .
तिन्ही आरोपी कडून आणखी तीन मोबाईल हॅण्डसेट हस्तगत करणेत आलेले असून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे . सदर कारवाई पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल , अपर पोलीस अधिक्षक धिरज पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगांव अतिरिक्त कार्यभार फलटण उपविभाग गणेश किंद्रे व उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली भारत किंद्रे पोलीस निरीक्षक फलटण शहर, सहाय्यक पोलीस निरीक्षक एन आर गायकवाड, सहाय्यक फौजदार एस.एन.भोईटे , पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही.पी.ठाकूर, पो.हे.कॉ आर.एस.भोईर, पो.हे.कॉ पी.एस.मदने, पो.ना एस डी.सुळ ,पो.ना एन.डी.चतुरे, पो.ना एस.ए.तांबे, पो.ना ए.एम.वाडकर , पो.ना एन.पी. भोसले , पो.ना व्ही.के.लावंड, पो. शि ए.एस.जगताप, पो.शि डी.डी.नाळे यांनी केलेली आहे. याबाबत स्वतः पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक धिरज पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली.