महाराष्ट्र न्युज वाई प्रतिनिधी
७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.या रक्तदान शिबिरात ५८ जणांनी रक्तदान केले अशी माहिती वाई उपविभागाच्या पोलीस उपाधीक्षक डॉ शितल जानवे खराडे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने करोना काळात रक्तदानाचे आवाहन सर्वांना केले आहे. पोलिसांनीही करोना काळामध्ये मोठी भूमिका बजावली आहे.समाजाप्रती खारीचा वाटा म्हणून वाई उपविभागीय पोलिस कार्यालयाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५८ जणांनी रक्तदान केले. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेने रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले .यावेळी आयडीबीआय बँकेचे अधिकारी मकरंद मुळे यांनी १०७ व्या वेळी रक्तदान केले.वाईचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे ,भुईंजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, मेंढ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी महिला पोलीस कर्मचारी आणि नागरिकांनी,पोलीस पाटील आदींनी उस्फूर्तपणे रक्तदान केले.
७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरासाठी सातारा जिल्हा रुग्णालयाच्या रक्त पेढीच्या डॉक्टर आणि सहायकांचा व याकामी मोलाचे सहकार्य करणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप यादव यांचा यावेळी डॉ शीतल जानवे खराडे यांनी सत्कार केला.शिबिर यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे ,सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे,मेढाचे अमोल माने,पाचगणीचे सतीश पवार,रवींद्र तेलतुंबडे,उपनिरीक्षक राजेंद्र कदम,संजय मोतेकर यांच्यासह अजित जाधव,निलेश देशमुख,धिरज नेवसे,बापुराव मदने,किरण निंबाळकर,श्रावण राठोड,नागेश्वर लांडगे,प्रशांत ठोंबरे,श्रीनिवास बिराजदार,सुनील भिंगारे,नंदकुमार महाडिक,स्नेहल शिंगटे,वाई पाचगणी,भुईंज,मेढा, महाबळेश्वर येथील अंमलदार आदींनी परिश्रम घेतले.