कराड : कराड नगरपरिषदच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसवून आज पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 जानेवारी 1972 साली मेसेस कराड इलेक्ट्रिक लि. कंपनी यांनी कराड नगरपालिकेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धकृती पुतळा भेट देण्यात आला होता. स्वर्गीय पी. डी. पाटील यांच्या हस्ते कराड नगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला होता.
सुवर्ण महोत्सवी वर्षाला यशवंत विकास आघाडी कडून दुग्धाभिषेक व रांगोळी सजावट करून पुष्पहार घालण्यात आला. पण कराड नगरपरिषद यशवंत विकास आघाडी यांच्या व्यतिरिक्त कराड नगरपालिका प्रशासन व इतर नगरसेवकांना या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा विसर पडला, असे दिसले.
या सुवर्णमहोत्सवी वर्षाला यशवंत विकास आघाडी चे नगरसेवक, संस्थापक, अध्यक्ष, नगरसेवक राजेंद्रसिंह यादव, विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान, निशांत ढेकळे, कश्मिरा इंगवले, बाळासाहेब यादव , गजेंद्र कांबळे, हनमंतराव पवार, किरण पाटील, प्रीतम यादव, बापू देसाई व सामाजिक कार्यकर्ते , यशवंत विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.