महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी गणेश पवार
शेतातील बांध का फोडला? अशी विचारणा केली म्हणून चौदा जणांच्या समूहाने राजेंद्र कुचेकर व त्यांच्या इतर भावांना खोऱ्याचा लाकडी दांडा, लोखंडी गज याने मारहाण केली अशी फिर्याद राजेंद्र कुचेकर यांनी दाखल केली असून त्या नुसार १४ जणांवर भा द वि ३२३,३२३,४५२,१४३,१४७,१४८,१४९,५०४ व ५०६ या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राजेंद्र कुचेकर वय ४५ वर्षे व्यवसाय- शेती रा खामगाव ता फलटण जि सातारा यांनी फिर्याद दाखल केली असून त्यामध्ये १ ) भानुदास रामचंद्र शिंदे २ ) अनिल भानुदास शिंदे ३ ) सागर शामराव जाइकर ४ ) आप्पा रामचंद्र शिदे ५ ) विनोद रामचंद्र शिंदे ६ ) विठ्ठल रामचंद्र शिंदे ७ ) तुकाराम विठ्ठल शिंदे ८ ) मोहन बोन्द्रे ) सोमनाथ झेंडे १० ) स्वप्निल जगन्नाथ भोसले १५ ) अभिजीत बोन्द्र १२ ) विक्रम भोसले १५ ) कृष्णात दादासो झेंडे १४ ) नवनाथ कुष्णा झेंडे अनं . १,२.४.५.६,७ , ९ , १०,११,१२ , रा मुरुम ता फलटण जि सातारा व अने ३.८.१३,१४ रा खामगाव ता फलटण जि सातारा यांनी मला ५/०३/२०२१ रोजी सकाळी ९ .०० वाजणेचे मुमारास फिर्यादीच्या खामगाव ता फलटण गावचे हद्दीतील जमिन गट नं .२१३ चे बांधावर व ता ५ /३/२१रोजी सकाळी १०.०० वाजणेचे सुमारास फिर्यादीचे राहते घरात आरोपी भानुदास रामचंद्र शिंदे, अनिल भानुदास शिंदे रा मुरुम व सागर शामराव जाडकर रा खामगाव यांनी मिळुन फिर्यादीचे खामगाव मधिल जमिन गट नं .२१३ चा बांध बैलाच्या नागराच्या मदतीने फोडला होता म्हणुन त्यांना मी व चुलत भाऊ अमित कुचेकर असे विचारणेस गेलो असता त्यांनी आम्हाला शिवीगाळ दमदाटी करुन खो – याचे दांड्याने मला व चुलत भाऊ अमित कुचेकर यांना भानुदास रामचंद्र शिंदे , अनिल भानुदास शिंदे रा मुरुम ता फलटण व सागर शामराव जाडकर रा खामगाव यांनी मारहाण केली त्यामध्ये मला डाव्या पायास व डाव्या हातास डोक्यात मारहाण केली व अमित यास अंगावर मारहाण झाली आहे तेथुन आम्ही आमचे घरी निघुन आलो तेथे पुन्हा ५/०३/२०२१ रोजी १०.०० वाजणेचे सुमारास मौजे खामगाव ता फलटण येथे माझे राहते घरात मी व माझे घरातील लोक असताना तेथे थोड्या वेळा पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात आरोपी सर्वजन हातात लाकडी दांडे व लोखंडी गज घेवुन बेकायदेशिर माझे घरात घुसले व ‘तुम्हाला आता ठेवत नाही, तुम्ही आता बांध पोकरने वरुन वारंवार वाद घालताय’ असे म्हणुन आम्हाला मारहाण केली अशी फिर्याद दिली असून अधिक तपास पो हवा.साबळे करीत आहेत.






















