चोरी केलेले सोन्याचे दागिने व मोबाईल केला हस्तगत…
महाराष्ट्र न्युज फलटण प्रतिनिधी गणेश पवार
दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सहा पैकी चार जणांना पोलिसांनी ताथवडे घाटामध्ये रात्रीच्या वेळेस पेट्रोलिंग करत असताना अटक केली असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व मोबाईल फोन असा ऐवज हस्तगत केला असून त्यांचे इतर दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दि .०१ / ०३ / २०२१ रोजी रात्री १०.०० वा ताथवडा घाटात पोलिस वाहन पेट्रोलिंग करीत असताना ताथवडा घाटाचे दुसरे वळणावर तीन पल्सर मोटर सायकल व तेथे थांबलेले सहा इसम दिसलेने पोलिसांनी त्यांना दोन्ही बाजुनी घेरले असता पोलीस वाहन पाहुन त्यामधील दोघेजण त्याचेकडील मोटर सायकलवरून पळून गेले व तेथे असलेले चारजण १ ) योगेश बाजीराव मदने वय ३० वर्ष रा.राजापुर ता.खटाब जि.सातारा २ ) सनि ऊर्फ सोन्या धनाजी भलकर वय २३ वर्षे रा.चौधरवाडी ता.फलटण ३ ) प्रथमेश ऊर्फ सोनू हणमंत मदने बय २१ वर्षे रा.उपळवे ता.फलटण जि.सातारा ४ ) किशोर हणमंत जाधव वय १९ वर्षे रा ताथवडा ता.फलटण व पळून गेलेले दोघे ५ ) महेश ऊर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे वय २५ वर्षे रा मोतीचौक फलटण ता फलटण ६ ) किरण मदने पुर्ण नाव माहिल माही रा राजापुर ता खटाब जि.सातारा असे एकुण सहा इसम यांनी ८०.०४० / – रू किमतीचा माल व हत्यारे जवळ बाळगुन मोजे ताधवडा ता.फलटण गावचे हददीत ताथवडा घाटात रोडवर दरोडा घालणेचे तयारीनिशी एकत्र मिळुन आले टावेळू चौघाजनांना जागीच पकडले असुन त्याचे अजुन दोन साथीदार पळून गेले त्याचा पाठलाग केला असता ते मिळुन आले नाहीत म्हणुन त्यांचे विरूध्द फलटण ग्रामीण पोलीस ठाणेत भा व वि.स.कलम ३ ९९ ४०२ व कलम ४,७,२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून . त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी दि .२३ / ०२ / २०२१ रोजी दुपारी १.०० वा.चे सुमारास वीरधरणाचे पात्रामध्ये काठावर बोलत बसलेले एक अनोळखी जोडपे यास दमदाटी करून त्यांचे जवळ असले सोन्याचे दागिने व मोबाईल बळजबरीने चोरी केलेची कबुली दिली असून त्यांचेकडुन १ ) ३०,००० / – रू किमतीचे गळयातील सोन्याची चैन त्याचे मध्यभागी एक बदाम असलेली सोन्याची चैन व बदाम याचेसह एकुण वजन ६.२३० ग्रॉम वजन असलेली .२ ) ५००० / -रू किमतीचे कानातील सोन्याचा १ टॉप्सचा जोड त्याचे एकुण वजन १.५५० ग्राम वजन असलेली .३ ) ५००० / -रू किमतीचा एम.आय नोट -४ कंपनीचा एक मोबाईल हॅन्डसेट जु.वा.कि.अं.हा मुददेमाल जप्त करणेत आला आहे . सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल सो अप्पर पो अधिक्षक धिरज पाटील सो उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे , फलटण व पोलीस निरीक्षक सावंत यांचे मार्गदर्शनाखाली पूर्ण केली असून या मध्ये सहा.पोलीस निरीक्षक बोबले.पोलीस उपनिरीक्षक शेख पो ना .१४५ ९ देवकर , पो ना .६८५ तुपे , चालक पोना.९ ७८ यादव , पो.कॉ .२३ ९ ४ कुंभार पो ना ६६१ काशिद पो.कॉ .२४६६ जगदाळे पो कॉ .१ ९ ५१ पाटोळे यांनी केली आहे.






















