नवारस्ता प्रतिनिधी : शेतकर्यांच्या जीवावर गडगंज झालेल्या कंपन्यांची प्रशासन आणि शेतकर्यांची फसवणूक करत आहे. पनामा विंड पाँवर प्रा. लि. या कंपनीने मोरणा भागात पवनचक्की टाँवरची उभारणी केलेली आहे. अनेक गावांमध्ये टाँवर उभारणी करत असताना शेतकर्यांचे अनेक प्रश्न त्यांनी प्रलंबित ठेवले आहेत. सध्य स्थिती मध्ये कंपनी दुसर्या कंपनी ला विकण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सदर पनामा कंपनीने शेतकर्यांचे प्रश्न मार्गी लावून हस्तांतरणाचा विषय घ्यावा यासाठी अग्रही भूमिका मनसेचे पाटण तालुका अध्यक्ष गोरख नारकर यांनी घेतली आहे. पाटण तालुक्यातील मोरणा पठारावरील मौजे. पाचगणी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पनामा विंड पाँवर कंपनी च्या विरोधात आमरण उपोषण सुरु आहे. उपोषणाचा मंगळवार दुसरा दिवस आहे. दुसर्या दिवशी उपोषणास मनसेचे कोयना विभाग अध्यक्ष दयानंद नलावडे, पाटण शहर अध्यक्ष चंद्रकांत बामणे, म्होप्रे मा सरपंच राहुल संकपाळ, सुपने विभाग अध्यक्ष संभाजी चव्हाण यांनी भेट दिली. सदर प्रकल्प उभारत असताना, ज्या गावंच्या हद्दीत प्रकल्प उभा केला त्या गावांना सीएस आर फंडाच्या माध्यमातून सेवासुविधा पुरवणे, अमाप वृक्ष तोड करण्यात आली त्याबदल्यात वृक्ष उभारणी करणं, गावांना नागरि सुविधा पुरवणे अश्या अनेक गोष्टी कंपनीने करायच्या होत्या. कोरोना काळात कोणत्याही प्रकारचे सहकार्य कंपन्या नी सदर गावांना केले नाही. रोजगार निर्मिती च्या बाबतीत तीनतेरा वाजवले आहेत. प्रकल्पामधून निर्माण झालेल्या उर्जेच्या ठराविक रक्कम शासन व ग्रामपंचायत कडे जमा करायची होती अशी रक्कम अद्याप जमा नाही. प्रकल्प उभारत असताना उत्खनन केलेले आहे त्याचा कर शासनाला जमा केलेला नाही. बिगरशेती मिळकती केल्या गेल्या त्यांचा कर भरलेला नाही. शासनाचा महसूल बुडवला आहे. शेतकर्यांच्या जमिनी कवडीमोल किंमती मध्ये खरेदी केलेल्या आहेत.
शेतकर्यांच्या जमिनीचे खोटे, बनावट रेकॉर्ड तयार केलेले आहे. सदर खोट्या नाट्य गोष्टींविरोधात लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत त्या शासन दरबारी रेंगाळत पडलेल्या आहेत. प्रशासनाच्या वतीने उपोषण स्थळी वैभव सोनवणे मंडलधिकारी मोरगिरी, डी. एन. निकाळजे तलाठी मोरगिरी, आम्रपाली नारवाडे तलाठी आंब्रग, प्रविण रहाटे कोतवाल यांनी भेट दिली. त्यावेळी पनामा पवनचक्की कंपनी ने केलेला अन्याय आणि प्रशासन व शेतकरी यांचे प्रश्न अद्याट सुटलेले नाहीत याबाबत चर्चा झाली. दिवसभरात परिसरातील अनेक शेतकर्यांनी उपोषण स्थळी भेट दिली.