पुणे : माजी खासदार आणि जनता पक्षाचे नेते संभाजीराव काकडे यांचं वृद्धापकाळाने 90 व्या वर्षी निधन झालं आहे. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1967 साली काँग्रेस पक्षामध्ये झालेल्या फुटीनंतर ते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष होते. गेल्या वर्षभरापासून ते आजारी होते.
संभाजीराव काकडे यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. शरद पवारांनी लिहिलं की, “माजी खसदार संभाजीराव काकडे यांच्या निधनाने बारामतीतील मातब्बर राजकीय व्यक्तिमत्व हरपले. जनता दलाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी राज्याच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकला. नव्या नेतृत्वाला दिशा देण्याचे कार्य निष्ठेने केले. शोकमग्न कुटुंबीयांप्रति सहसंवेदना. भावपूर्ण आदरांजली!.’






























