
राज्यात घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 2019 या परीक्षेतील पेपर फुटी गैरव्यवहार झाल्याने हे प्रकरण उघडकीस आले. सात हजार 580 अपात्र परीक्षार्थींना पात्र ठरवण्यात आले. या परीक्षेच्या अंतिम निकाल यादी एकूण सोळा हजार 705 पात्र ठरले. त्यांना टीईटी प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. परीक्षेच्या अंतिम यादीतील निम्म्या परीक्षार्थींनी कडून पैसे स्वीकारून त्यांची नावे बनावट पद्धतीने टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व त्या परीक्षार्थी कडून प्रत्येकी तीन ते चार लाख रुपये घेण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.






















