सातारा दि. : कोविड-19 मुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मृत्यू संख्येत दैनंदिन वाढ होत आहे. रुग्ण इतिहास पाहिला असता हॉस्पिटलला येण्यापूर्वी रुग्ण अनेक ठिकाणी उपचार करुन आणि उशिरा हॉस्पिटलला आलेला आहे, असे दिसून येते. यावरुन रुग्णाची वेळेत कोविड टेस्ट न करणे, त्यास वेळेत रेफर न करणे, अचुक मार्गदर्शन व उपचार न झाल्याचे दिसून येते.
सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांची दि. 21 एप्रिल रोजी कार्यशाळा आयोजित करुन पुनर्प्रशिक्षण देण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी दिल्या आहेत. या कार्यशाळेमध्ये वैद्यकीय व्यवसायीकांना शासनाच्या रुग्ण हाताळणी, कार्यपध्दती, टेस्टींग, उपचार,रेफर इ. सर्व बाबतीत शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्याबाबत सखोल मार्गदर्शन करावे. यासाठी या कार्यालयाकडील तसेच शासनाच्या सर्व परिपत्रकांचा वापर करावा. कोविड-19 बाबत सर्व बाबी ज्ञात कराव्यात.
या प्रशिक्षणास वैद्यकीय व्यवसायीक अनुपस्थित राहील्यास त्यांचेवर साथरोग प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई केली जाईल याची समजही देण्यात यावी असेही जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले .
0000