फलटण प्रतिनिधी:-ग्रामपंचायत मुरूम ता फलटणच्या सदस्या कार्तिकी संजय पवार या ग्रामपंचायतीच्या सलग ७ मासिक सभांना विनापरवाना गैरहजर राहीलेबद्दल व हा कालावधी १९३ दिवसांचा म्हणजेच १८० दिवसांपेक्षा जास्त असल्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ४० (१) अन्वये त्यांचे सदस्य पद रद्द करण्यात आले आहे.
ज्ञानेश्वर खिलारी, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सातारा यांनी ग्रामपंचायत मुरूम ताच्या सदस्या कार्तिकी संजय पवार यांचे सदस्यपद रिक्त होत असल्याचा आदेश दिंनाक 18 एप्रिल रोजी दिला असुन ग्रामपंचायत मुरूम चा ग्रामपंचायत कार्यकारीणीचा कालावधी दि. २४/०२/२०२१ ते दि. २१/२/२०२६ याप्रमाणे आहे कार्तिकी संजय पवार या ग्रामपंचायत मुरुम ता. फलटण या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य असताना गटविकास अधिकारी पंचायत समिती फलटण यांनी या कार्यालयास दि. २७/०१/२०२३ रोजी चौकशी अहवाल सादर करून कार्तिकी संजय पवार या दि. १२-११-२०२१ ते दि. २३-०५-२०२२ अखेर ग्रामपंचायतीच्या ७ मासिक सभांना विनापरवाना गैरहजर राहीलेने त्यांचे सदस्य पदाबाबत आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत कळविले होते.
कार्तिकी संजय पवार ग्रामपंचायत सदस्य यांना मा. प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सातारा यांचेकडील नोटीस प्राप्त झालेनंतर त्यांनी सुनावणी दिनांकाखेर कोणताही लेखी खुलासा जिल्हा परिषद कार्यालयास किंवा पंचायत समिती कार्यालयास सादर केलेला नाही तसेच त्यांचे म्हणणे मांडण्याकरीता दि.१७/०४/२०२३ रोजी सकाळी ११.३० वा. त्यांच्या दालनात सुनावणी आयोजित केली होती. त्यास कार्तिकी संजय पवार ग्रामपंचायत सदस्य या गैरहजर राहील्या.
याबाबत वस्तुस्थितीचे आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती फलटण यांच्या अहवालाचे अवलोकन केले असता कार्तिकी संजय पवार या दि. १२-११-२०२१ ते दि. २३-०५-२०२२ अखेर ग्रामपंचायतीच्या ७ मासिक सभांना विनापरवाना गैरहजर असून हा कालावधी १९३ दिवसांचा म्हणजेच १८० दिवसांपेक्षा जास्त आहे. तसेच सौ. कार्तिकी संजय पवार यांना मासिक सभांना विनापरवाना गैरहजर राहीलेबद्दल मा. प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सातारा यांनी नोटीस देऊन खुलासा मागणी केली असता त्यानी मुदत वेळेत खुलासा सादर केलेला नाही असे निदर्शनास आले.
त्यामुळे ज्ञानेश्वर खिलारी, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषद सातारा, यांनी सौ. कार्तिकी संजय पवार हे दि. १२-११-२०२१ ते दि. २३-०५-२०२२ अखेर ग्रामपंचायतीच्या ७ मासिक सभांना विनापरवाना गैरहजर राहीलेबद्दल व हा कालावधी १९३ दिवसांचा म्हणजेच १८० दिवसांपेक्षा जास्त असल्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ४० (१) अन्वये त्यांचे सदस्यपद रिक्त होत असल्याचे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ४०(२) अन्वये प्राप्त अधिकारांन्वये जाहिर केले.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ४० (१) अन्वये, पंचायतीचा जो सदस्य आपल्या पदावधीत (अ) सहा महिन्याहून अधिक नसलेल्या मुदतीपर्यंत गावात अनुपस्थित रहाण्यास पंचायतीकडून परवानगी देण्यात आलेली असल्याशिवाय, उक्त गावांमध्ये लागोपाठ चार महिन्याहून अधिक मुदतीपर्यंत अनुपस्थित राहील, किंवा (ब) उक्त पंचायतीच्या परवानगी शिवाय पंचायतीच्या सभांना स्वतः लागोपाठ सहा महिने अनुपस्थित राहील, तर तो सदस्य असण्याचे बंद होईल व त्याचे पद रिकामे होईल, कलम ४०(२) अन्वये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाने स्वाधिकारे किंवा त्या बाबतीत त्यांच्याकडे केलेल्या अर्जावरुन या कलमान्वये एखादे पद रिक्त झाले आहे किंवा काय, असा कोणताही प्रश्न उपस्थित केला असेल, तर अध्यक्षाने असा अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून शक्यतो साठ दिवसांच्या आंत त्या प्रश्नाचा निर्णय घेतला पाहिजे अशी तरतूद आहे.