महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :कोरेगाव
कोरेगाव तालुका तहसिलदारांमार्फत मोदी सरकारला निवेदन.
युवकांसाठी वर्षाला 2 कोटी रोजगारनिर्मिती करण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान मोदी सरकार सत्तेवर आले, पण परिस्थिती वेगळीच आहे. नोटबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगारनिर्मिती करणाऱ्या कृषी व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. त्याची परिणती म्हणजे करोडो रोजगार नष्ट होण्यात झाली. त्यात वस्तू सेवा कराच्या (GST) चुकीच्या अंमलबजावणीमूळे कुटीर- लघु-मध्यम क्षेत्राचे आणि उद्योगधंदयांचे पार कंबरडे मोडले गेले. याचा परिणाम म्हणजे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली.
यानंतर कोरोनामुळे काहीही नियोजन न करता लादलेल्या लॉकडाऊनमुळे 12 ते 13 करोड लोक बेरोजगार झाले असल्याचे CMIE च्या पाहणीतून समोर आले आहे. तेवढ्याच कुटुंबांचे जगणे रोजगाराविना मुश्किल झाले आहे.पंतप्रधान मोदी यांच्या लहरी व चुकीच्या धोरणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्था रसातळाला गेली असून नुकतेच भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून -२३.९ टक्क्यांनी आक्रसल्याचे समोर आले आहे.
सरकारच्या भारतीय सांख्यीकी आयोगाच्या (NSC) अहवालानुसार देशात 2017-18 या वर्षात बेरोजगारीचा दर 6.1 टक्के असुन ग्रामीण भागातला बेरोजगारीचा दर 5.3 टक्के होता तर शहरी भागात 7.8 टक्के राहिला. तरुणांमध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक, म्हणजे 13 ते 27 टक्क्यांवर पोहोचला आहे. तरी मोदी सरकारने ही स्थिती सुधारून बेरोजगार तरूणांना रोजगार द्यावा अशी मागणी सातारा युवक काँग्रेसने आज निवेदनाद्वारे त्यांच्याकडे केली आहे.
यावेळी अमित जाधव जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया युवक काँग्रेस सातारा, दीपक कांबळे प्रदेश प्रतिनिधी NUSI, केदार केंदळे उपाध्यक्ष कोरेगाव युवक विधानसभा, अनिकेत भोसले माजी जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस, अनिकेत घनवट.सरचिटणीस युवक काँग्रेस कोरेगाव आदी उपस्थित होते.