महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (मायणी) : मंगेश भिसे
मायणी येथील फुलेनगर परिसरात ग्रामपंचायत पाणी पुरवठा यंत्रणेकडून उशिरा पाणी पुरवठा होत असून तो सुरळीत होण्यासाठी व फुलेनगर रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढल्याने लोकांची होणारी गैरसोय यासाठी ही झुडपे काढण्यात यावी या दोन मागणी प्रश्नी जनता क्रांती दलाचे पश्चिम महाराष्ट्राचे युवक अध्यक्ष विकास सकट यांचेकडून स्थानिक प्रशासनास वेगवेगळें निवेदन देण्यात आले आहे . सदर निवेदन ग्रामविकास अधिकारी मोहन माळी यांनी स्वीकारले .
खालील प्रमाणे निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या
पाणी पुरवठा अपरात्री न करता दिवसा करणे
मायणी फुलेनगर येथील नागरिकांच्या संबंधित विषयास अनुसरून तक्रारी संघटनेकडे आल्या आहेत . आपणास विनंती आहे संबंधित विभागामध्ये कष्टकरी , मजूर आणि इतर ठिकाणी कामावर जाणारे नागरिक आहेत . त्यामुळे लॉक डाऊन कालावधीमध्ये कामावरून लोक कंटाळून येत असतात.त्यातच मध्यरात्री नळाला पाणी येते तेही कमी दाबाने.लोकांची रात्र पाणी भरण्यामध्ये जाते.नागरिकांना मनःस्ताप होतो आहे .
फुलेनगर रस्त्यावरील झुडपे हटवणे
फुलेनगर येथील रस्त्यावरती पाऊसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये काटेरी झाडे झुडपे वाढलेली आहेत या झाडाझुडपांमुळे सरपटणारे प्राणी रस्त्यावर येत आहेत . या रस्त्यावरून अबालवृद्ध ये जा करीत असतात . याच्यामुळे महिला मुली रस्त्यावरून बाजारपेठेत येण्यात भीत आहेत . या झुडपांमुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत . मोठा अपघात होण्याची शक्यता आहे . तरी लवकरात लवकर याच्यावरती कारवाई होऊन झाडे झुडपे काढून टाकावीत . ओढ्याला संरक्षक भिंत बांधणेत यावी . सांडपाण्यासाठी गटार बांधण्यात यावे .

गेली सहा महिने पाणी प्रश्न चालू आहे . लोकांच्या हाताला एकतर काम नाही कोरोनाच्या महामारीमुळे लोक बेरोजगार आहेत , त्यातच ग्रामपंचायतीच्या या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना त्रास भोगावा लागत आहे . लवकरात लवकर यावर निर्णय घेऊन लोकाना या त्रासातून मुक्त करावे . अन्यथा संघटनेच्या वतीने मध्यरात्री पाणी आल्यानंतर आपल्या कार्यालयामध्ये जागरण घालण्यात येईल . त्यावेळी होणाऱ्या परिणामांची जबाबदारी सर्वस्वी मायणी ग्रामपंचायतीची असेल :विकास सकट ,युवक अध्यक्ष,जनता क्रांती दल.प.महाराष्ट्र.
































