फलटण प्रतिनिधी : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने फलटण येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने कै. हिंदुरावजी नाईक निंबाळकर कोविड उपचार केंद्राचे उद्या १२/५ रोजी सायंकाळी ५ वाजता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे या उपचार केंद्रात ५० ऑक्सीजन बेड सह बाधित रुग्णांसाठी ५० बेड असे एकूण १०० बेड तयार करण्यात आले आहेत .फलटण परिसरामध्ये रुग्णाची मोठ्या प्रमाणावर मध्ये वाढ होत असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहेत, फलटणमधील आरोग्य सुविधा कमी पडायला लागली म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुढाकार घेऊन उत्कर्ष लॉज , रविवार पेठ येथे आधुनिक पद्धतीचे व सर्व सोयींनी युक्त असे यंत्रणा उभी करुन कोविड सेंटर उभे केले आहे. त्यासाठी लागणारा खर्च स्वतः त्यांनी केलेला आहे .शासनाच्या वतीने सर्व वैद्यकीय अधिकारी इतर पॅरामेडिकल स्टाफ, लागणारे औषधे, ऑक्सिजन हे शासन पुरवणार आहे.तसेच रुग्णांच्या चहा पाणी व जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, विरोधी पक्षनेते समशेर सिंह नाईक निंबाळकर, फलटणचे प्रांत अधिकारी मा.शिवाजी जगताप साहेब, डी वाय एस पी तानाजी बर्डे साहेब, तहसीलदार समीर यादव साहेब उपस्थित राहणार आहेत तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व आघाडी ,मोर्चाचे, अध्यक्ष पदाधिकारी , नगरसेवक पंचायत समिती सदस्य, सरपंच व जुने जाणते सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती फलटण शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमोल सस्ते यांनी दिली