सर्वच स्तरातून फलटण प्रांतांचा निषेध, जशास तसे उत्तर देऊ पत्रकारांनी दिला इशारा
फलटण प्रतिनिधी – फलटण येथील सुविधा हॉस्पिटल च्या वॉर्ड बॉय कडून चढ्या दराने रेमडिसिव्हर इंजेक्शन ची विक्री झाल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय सातारा व अन्न औषध प्रशासन तसेच फलटण शहर पोलीस ठाण्यातुन तसा उल्लेख केला होता. या अनुषंगाने त्या वॉर्ड बॉय चे वृत्त सर्वच वर्तमानपत्र यांनी प्रसिद्ध केले होते.त्याचा तपास सुरू असताना फलटण चे प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी या मध्ये हस्तक्षेप करीत तपासाची दिशा भटकवण्याचा प्रयत्न केल्याने व वर्तमानपत्र तसेच पत्रकारांची बदनामी केल्याने प्रांतांवर जिल्हाधिकारी यांनी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की फलटण शहर पोलीस ठाणे व जिल्हा औषध प्रशासन यांनी मिळालेल्या माहितीनुसार रेमडिसिव्हर इंजेक्शन चढ्या दराने विक्री होत आहे.अशी माहिती मिळाली यावरून कारवाई केली. या मध्ये येथील सुविधा हॉस्पिटल चा वॉर्ड बॉय सापडला या वरून जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय सातारा यांनी या बाबतची माहिती सर्व वर्तमान पत्र यांना दिली.व त्या नंतर फलटण शहर पोलीस ठाण्यातून एक प्रसिद्धी पत्रक काढले.या मध्येही सुविधा हॉस्पिटल चा वॉर्ड बॉय आहे अशी माहिती दिली. या वरून सर्व वर्तमानपत्रात याचे वृत्त प्रसिध्द झाले.या नंतर फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे व त्यांच्या टीमने रात्रभर जागून अजून या मध्ये कोणकोण सहभागी आहे.याची माहिती घेत परत चौघांना ताब्यात घेतले. असे एकूण आठ जणांना न्यायालयात हजर केले या वेळी या सर्वांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कस्टडी दिली.
दरम्यान या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा औषध प्रशासन व पोलीस अधिकारी यांनी हे प्रकरण तडीस न्यायचे असा चंग बांधला असताना तपासाची दिशा भटकवण्यासाठी फलटण चे प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी हॉस्पिटल ला क्लिनचिट देत हे खापर प्रसारमध्यमांवर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न सोशल मीडियावर केल्याने त्यांचा चांगलाच समाचार पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांनी घेतला असून या रेमडिसिव्हर प्रकरणात अनियमितता झाल्याने या मध्ये स्वतःप्रांत कार्यालय अडचणीत येणार आहे.
हॉस्पिटलने स्वतःला आवश्यक असणाऱ्या पुरविलेल्या सुविधांना बळी पडून PRO होण्याचा मोह प्रशासनातील अधिकाऱ्याला पडला असेल त्यामुळे हा खुलासा केला असावा – युवराज शिंदे, सामाजिक कार्यकर्ते
फलटण मध्ये पेशेंट ला बेड मिळेना इंजेक्शने मिळेनात, हॉस्पिटल मधील बील भरमसाठ आकारली आहेत. गोरगरीब लोकांना महात्मा जोतिबा फुले जन आरोग्यया योजनेचा लाभ मिळेणा, या कडे फलटण प्रशासन लक्ष्य देणे गरजेचे आहे. – अमिरभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते
आम्ही नावासह बातमी छापली आहे. डॉक्टरांना त्याची लाज वाटत असेल तर त्यांनी आमच्यावर कायदेशीर कारवाई करावी. त्यांच्या कृतीला उत्तर देण्याची धमक व हिम्मत आमच्या लेखणीत नक्कीच आहे. – किरण बोळे पत्रकार
जिल्हा माहिती कार्यालय व फलटण पोलिसांकडून अधिकृत रित्या नाव आलेले आहे. त्या मुळे सदरील हॉस्पिटलचे नाव आलेले आहे.
जर हॉस्पिटल प्रशासनाला या बाबत काही खुलासा करायचा असेल तर त्यांनी सर्व पत्रकारांना बोलवून पत्रकार परिषद आयोजित करून त्यांची बाजू सांगणे गरजेचे आहे. – प्रसन्न रुद्रभटे, पत्रकार
जिल्हा माहिती कार्यालय आणि फलटण शहर पोलिसांनी गुन्ह्यात त्यांच्या हॉस्पिटल च्या नावाचा वापर केला आहे,याची माहिती प्रांतांनी घ्यावी,विनाकारण बोलू नये – नाशिर शिकलगार पत्रकार
तक्रार कशी नोंद करावी, त्यामध्ये आरोपीचे नाव कसे घ्यावे, व नोंद केलेल्या तक्रारीचे वृत्त कसे द्यावे हे काय प्रांतांनी शिकवावे का? त्यांना काही अधिक माहिती असेल तर याबाबत पत्रकार व पोलिसांची कार्यशाळा आयोजित केली जावी -अनुप शहा सामाजिक कार्यकर्ते
फलटण प्रशासन पोलीस तपासात लुडबुड करतय असं दिसतंय रेमडेसीव्हर इंजेक्शनचा चा काळा बाजाराचे धागेदोरे सुविधा हॉस्पिटल मधील कंपाउंडर पासून ते कराड पर्यंत पोहोचले असून तपास पारदर्शक होणे गरजेचे आहे आणि खरा सूत्रधार कोण आहे ते जनतेला कळलेच पाहिजे,
पत्रकार बातमी द्यायचे काम करतात व तपास पोलीस यंत्रणा करतात प्रांतांनी या मध्ये लुडबुड करू नये -काकासाहेब खराडे सामाजिक कार्यकर्ते.