हिंदू एकतेचे तालुकाध्यक्ष तुषार उर्फ गणेश पाटील यांनी आज जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधत सुपने प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकांचा सन्मान केला,यावेळी त्यांच्यावतीने सॅनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले. यावेळी गणेश पाटील यांनी बोलताना सांगितले की कोणत्याही रुग्णालयातील रुग्ण हा डॉक्टरांपेक्षा अधिक काळ परिचारिकेच्या देखभालीखाली असतो,रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची परिचारिका या अहोरात्र सेवा करत असतात,आताच्या घडीलाही कोरोनो सारख्या महाभयंकर संकटात परिचरिकांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे,वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचे योगदान अमूल्य असेच आहे त्यांच्याशिवाय वैद्यकीय क्षेत्र पूर्णत्वास जाऊच शकतं नाही.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ स्नेहा हुंद्रे,डॉ सुनीता खरात,रमेश पाटील ,परिचारिका भाग्यश्री सूर्यवंशी,शोभा यादव,अपर्णा कोळी,सुवर्णा गुजर, तसेच अजित जाधव व विकी कांबळे उपस्थित होते.