राष्ट्रीय एकता आंदोलन, समता सैनिक दल, काष्ट्राइब यांचे संयुक्त विद्यमाने ईविएम हटाव देश बचाव! ईविएम हटाव संविधान बचाव!! या मागणी साठी एकदिवसीय धरणे आंदोलन संविधान चौक येथे अरुण गाडे अध्यक्ष काष्ट्राइब, यांचे पुढाकाराने, प्रा रमेश पिशे, प्रदीप गायकवाड, प्रा मधुकर उईके, प्रा राहुल मुन, प्रा एम एस वानखेडे, प्रदीप मुन, अशोक सरस्वती यांचे उपस्थित मध्ये आयोजित करण्यात आले .ईविएम हटाव संविधान बचाव घोषणा देऊन
व लोकसभा -2024ची निवडणूक फक्त बॅलेट पेपर वरच झाली पाहिजे या मागणी साठी आंदोलन करण्यात आले.आताचे सरकारने संविधानाचे अवमुल्यन करून ईडी, कोर्ट, चॅनेल, निवडणूक आयोग सह सर्व सरकारी संस्थावर अधिकार प्राप्त केलेला आहे,सर्व मीडिया सुद्धा गुलाम केला आहे.आरएसएसला या देशात हिंदुत्वच्या नावाखाली ब्राम्हणी व्यवस्था रुजवायची आहे, त्यासाठी सत्ता प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणून साम -दाम -दंड -भेद वापरुन सत्ता हस्तगत करणे त्याचसाठी ईविएमचा गैर वापर सुरु आहे, देशातील सत्ताधारी ईविएम द्वारेच निवडणूकित विजय प्राप्त करित आहे जिंकत आहे,अशी भारतीय नागरिकांची खात्री झाली आहे .महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण, शिक्षणाचे बाजरीकरण मणिपूर, महिलावर अत्याचार यामुळे लोकशाही धोक्यात आहे, जनता असुरक्षित आहे संविधान धोक्यात आहे.सत्ताधारी देशाला मनुवादी व्यवस्थेकडे नेण्याचे षडयंत्र करित आहे, बहूजनांना गुलाम करण्याचा आणि हिंदू राष्ट्र चा अजेंडा राबविण्यासाठी सत्ता प्राप्त करणे आहे त्यासाठी ईविएम माध्यम आहे.ईविएम हटाव -संविधान बचाव!ईविएम हटाव – -देश बचाव!!आणि येणारी 2024ची लोकसभा निवडणूक बॅलेट पेपर वरच घ्यावी.या मागणीसाठी संविधान चौक, नागपूर येथे जनआंदोलन करण्यात आले.याप्रसंगी हरिकिसन दादा हटवार,श्यामराव हाडके,हरीश उईके,सुषमा कळमकर, प्रतिभा पाटील, एम एस जांभुळे,राजकुमारी पोफरे संजय सायरे,अरविंद पाटील, किशोर खांडेकर प्रा सिद्धार्थ कांबळे,सिद्धार्थ उके, राजेश ढेंगरे,रणजित रामटेके,अशोक पाटील, प्रतिभा खोब्रागडे, व शेकडो प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अरुण गाडे , यांनी भूमिका मांडताना राष्ट्रीय एकता आंदोलन अंतर्गत ईविएम हटाव-संविधान बचाव आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र करण्यात येणार असल्याचे मत व्यक्त केले
या आंदोलनात विविध सामाजिक, कामगार, कर्मचारी संघटना काष्ट्राइब महासंघ, संविधान परिवार, राष्ट्रीय संयुक्त मोर्चा, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडेरेशन राष्ट्रीय चर्मकार संघ,बुद्ध विहार समन्वय समिती, ट्रायबल ऑफिसर फोरम,आणि अनेक सामाजिक, कामगार संघटना सहभागी झाल्यात विनीत -सिताराम राठोड






























