
वाई येथे जिविका फर्निशिंग्जच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.शीतल जानवे-खराडे,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, नितीन भिलारे, रमेश गायकवाड, महाबळेश्वर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रोहित ढेबे, राजेंद्र पार्टे, सुनील शिंदे, संदीप मोरे, अभय डोईफोडे, अनिकेत रिंगे, आनंद चिरगुटे, अरविंद कुदळे, अमोल भिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वाई तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रमोद शिंदे म्हणाले, महाबळेश्वर पाचगणी वाई येथील हॉटेल, बंगले यांना हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेसमधील सर्व सेवा पुरविणाऱे संतोषकुमार तिवारी व त्यांची जिविका हॉस्पिटॅलिटीने ‘बिग बॉस’ सारख्या मालिकांना, गोवा, लोणावळा, कोकणातील हॉटेल्सना सेवा पुरवताना ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.
ॲड.मधुकर चौधरी, संतोषकुमार तिवारी यांनी स्वागत केले. मंजिरी चौधरी यांनी प्रास्ताविक केले विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. कल्याणी तिवारी यांनी आभार मानले.































