महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (इंदापूर): शहाजीराजे भोसले
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या २० व्या गळीत हंगाम सन २०२०-२१ चा बाॅयलर अग्निप्रदिपन समारंभ कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंञी हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते शुक्रवारी ( दि.२५ ) उत्साही वातावरणात संपन्न झाला . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे उपस्थित होते .
चालु गळीत हंगामात कारखाना ७ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पुर्ण करणार आहे . त्या दृष्टीने नियोजन पुर्ण करण्यात आलेले आहे . चालु गळीत हंगामासाठी कारखान्याची यंत्रणा सुसज्ज झाली असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले .
याप्रसंगी सत्यनारायणाची महापूजा कारखान्याचे संचालक दत्तू सवासे व त्यांच्या पत्नी नागरबाई सवासे यांच्या हस्ते करण्यात आली . तसेच यावेळी कारखान्याचे शुक्रवारी ( दि.२५ ) मयत झालेले कर्मचारी महेश आरडे , काटी यांना हर्षवर्धन पाटील व उपस्थितांनी दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली .
याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार , उपाध्यक्ष कांतिलाल झगडे , आनंदराव पाटील , विलासराव वाघमोडे , उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील , कृष्णाजी यादव , प्रतापराव पाटील , दादासो घोगरे , संजय बोडके , प्रकाश मोहिते , हरिदास घोगरे, मच्छिंद्र वीर , बबनराव देवकर , भागवत गोरे , चंद्रकांत भोसले , प्रसाद पाटील , संगिता पोळ , जबीन जामदार , प्र.कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील , अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते .