लोककल्याणासाठी लोकशाही ही संकल्पना सूक्ष्मदर्शक किंवा दुर्बिणीच्या सहाय्याने ओळखण्याच्या दिवसात किमान मराठी, मध्यमवर्गीय, वडापाव, भोजन थाळी किंवा हिंदुत्व या मध्यमवर्गीय, निम्नमध्यमवर्गीय यांच्या जीवनावश्यक प्रतिकांवर सत्ताधारी सध्या सत्तेत आहे, हेही नसे थोडके. मध्यमवर्गियांना समाधानी ठेवण्यात शिवसेनेला यश लाभो ही प्रार्थना.
देशाच्या इतिहासाच्या कार्यकाळाचा धांडोळा घेताना पन्नास ,साठ वर्षांचा कालावधी अत्यंत अल्प म्हणता येईल. एखादी संस्था , व्यक्ती,राजकीय पक्ष यांच्या दृष्टीने असा कालावधी अत्यंत महत्त्वाचा ठरत असतो. याचे कारण हा कालखंड सिंहावलोकनाचा असतो.पुढील वाटचाल ठरवण्यासाठी ती एक पायरी असते. तो टप्पा असतो .शिवसेना आपला वर्धापन दिन आज साजरा करत आहे .सुमारे पंधरा दिवस ते तीन आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने आपला बाविसावा वर्धापन दिन साजरा केला .आज शिवसेना 55 नावा वर्धापन दिन साजरा करत आहे. सबब सर्वप्रथम शिवसेनेला मनःपूर्वक शुभेच्छा..!त्यांच्या आगामी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!
आमची संख्या, तुमचा अनुभव
दोन्ही पक्ष सध्या महाआघाडीत आहेत सहयोगी आहेत. एका पक्षांच्या अध्यक्षांकडे आमदारांची संख्या जास्त आहे; तर दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षांकडे पक्षाचे वय तिघात तुलनेने कमी आहे. मात्र अनुभवाचा महाप्रचंड साठा आहे. या दोघांनी अनुभव,वय अधिक असलेल्या राष्ट्रीय राजकीय पक्षाबरोबर म्हणजेच काँग्रेसबरोबर एकत्र रहात राज्यातल्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळाची दोन वर्षे पूर्ण केली आहेत. कोविडच्या जागतिक संकटातच यातला बहुतेक काळ संपला. तेव्हा आघाडीच्या महाविकास यातील महा या विशेषणाकडे आघाडी वाटचाल करू शकली नाही. राज्यकर्त्यांची सगळी शक्ती कोविडशी लढण्यातच कामी आली .येत आहे . आणि हे वास्तव नाकारता पण येणार नाही. कोविड निर्मूलन, कोविडचा धोका संपण्यासाठी सर्वार्थाने महाआघाडीला राज्यात यश मिळावे ही या दिवसानिमित्त परमेश्वर चरणी प्रार्थना.
अपेक्षा आहेत
वर्धापन दिन निमित्त शिवसेनेकडून काही अपेक्षा नक्कीच आहेत. सर्वसामान्यांना समाधानी करायाच्या अपेक्षा आहेत. याबाबत पक्ष नेते सिंहावलोकन करतील आणि त्यानंतर किमान पंचवीस वर्षांची वाटचाल ठरवतील अशी अपेक्षा आहे. राजकीय पटलावर त्यानी आपल्याला पाहिजे ते कमवून दाखलंच आहे.शिवसेना हिंदूत्ववादी संघटना म्हणून ओळखली जाते. अर्थात मराठी माणूस हे त्यांचे स्थापना करताना चे मूळ उद्दिष्ट होते .मग पक्ष वाढवत असताना आणि मुंबईसारख्या महानगरात त्याची व्याप्ती विस्तारत असताना मराठी माणूस तेवढाच विचार किंवा लक्ष केंद्रित करून चालणार नाही ;हा व्यवहारिक विचार स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केला. मराठीचा मुद्दा देशभर चालण्यासारखा नाही तेव्हा हिंदू या देशभरात चालणाऱ्या मुद्द्याशी त्यांनी पक्षाला जोडले .मुंबईमध्ये चालणारा ‘मराठी माणूस’ हा मुद्दा चंद्रपूर ,सातारा, नाशिक, अमरावती या ठिकाणी चालणारा नव्हता याचं भान ठेवून शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय प्रवाहात उतरली. बाबरी मशिदीच्या संदर्भात, ती पाडण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि आपण हिंदुत्ववादी असल्याच्या भूमिकेला अधोरेखित केले .अर्थात ते राष्ट्रीय प्रवाहात आले असले तरी शिवसेना हा राष्ट्रीय पक्ष झाला नाही. राज्यातही स्वबळावर सत्ता स्थापन करण्या एवढा मोठा पक्ष तो झाला नसल्याचे गेल्या दोन निवडणुकांनमधून स्पष्ट झाले. मात्र सहयोगी पक्ष म्हणून आपण अत्यंत महत्त्वाची जबाबदारी किंवा भूमिका पार पाडू शकतो हे शिवसेनेने दाखवून दिले आहे .मनोहर जोशी ,नारायण राणे आणि आता उद्धव ठाकरे हे तीन मुख्यमंत्री शिवसेनेने सहयोगाच्या भूमिकेतूनच राज्याला दिले .काँग्रेस नंतर शिवसेनेनेच राज्याला एवढे मुख्यमंत्री दिले हे मान्य करावे लागेल. यापुढे स्वबळावर मुख्यमंत्री असावेत ही ताकद त्यांनी कमवावी.
ताई की दादा ? हा मुद्दा
शिवसेनेच्या मानाने राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत जास्त काळ राहूनही मुख्यमंत्रिपदापर्यंत पोचू शकली नाही ,किंवा पोहोचण्याची इच्छा त्या अर्थाने दाखवली नाही. हे ही वास्तव मान्य करावे लागेल. या वास्तवाची कारणे काही असोत. राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पदाचे उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही हा निष्कर्ष मात्र नक्कीच निघतो .राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते ,नेते, महत्वाचे नेते; मुख्यमंत्रीपदी दादा की ताई या प्रश्नातच अजूनही अडकलेले आहेत. त्याचे उत्तर स्फोटक आणि धक्कादायक असण्याचे वास्तव आणि शक्यता अधिक असल्याने तुर्तास राष्ट्रवादीच्या सुकाणूधारकांनी इलाज, नाईलाजाने मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून समजूतदारपणे माघार घेतली असावी.असो मुद्दा शिवसेनेचा आहे .त्यांच्या सर्वसमावेशक हिन्दुत्वाचा आहे. गेल्या दोन वर्षात त्यांनी हिंदुत्व या मुद्द्यावर त्यांच्या पद्धतीने योग्य तो तोडगा काढला आणि त्या मध्यम मार्गावर चालत आज शिवसेना सत्तेत मुख्यमंत्रीपदावर आहे . राजकीय पक्षांचा अगदी सगळ्याच राजकीय पक्षांचा सत्ता प्राप्त करणे हा अंतिम विचार असतो. कृती, उद्दिष्ट असते. ते उद्दिष्ट ते येनकेन प्रकारे साध्य करण्यासाठी मिळेल त्या मार्गाचा अवलंब करत असतात. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेनेही ही ते साध्य केले .उद्धव ठाकरे यांचे या राजकीय व्यवहारिक शहाणपणा बद्दल नक्कीच अभिनंदन केले पाहिजे.
व्यक्तिकेंद्रीत राजकारणाचा प्रभाव
पक्ष चालवण्यासाठी आवश्यक आयडियालॉजी वा गृहितके ,कार्यक्रम कार्यकर्त्यांना द्यावा लागतो. पक्षाच्या धोरणाचा हा एक भाग असतो. पक्षाचे धोरण ठरवणाऱ्या नेत्यांचा तो एक वेगळा विचार असतो.तर प्रत्यक्षात सत्ता प्राप्ती आणि त्यानंतर सत्ता चालवणे याची आयडियालॉजी, गृहितके, प्रमेये सोडवण्याची पक्षाध्यक्ष आणि नेत्यांची पद्धत अत्यंत वेगळीच असते.त्यातही राष्ट्रवादी,शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यासारख्या व्यक्तिकेंद्रित पक्षात तर थेटपणे या दोन्ही मार्गांचा प्रच्छन्न वापर केला जातो हे वारंवार सिद्ध झाले आहे. आज गरज सत्ता ताब्यात ठेवण्याची आहे .असते .त्यासाठी तीन पक्ष एकत्र यायला आज रोजी राजी आहेत. पक्षाची ध्येयधोरणे अर्थात तत्वज्ञान बाजूला ठेवण्यासही ते तयार झाले. एकमेकांवरच्या आरोपप्रत्यारोपांना शांतपणे विसरून जाण्यासाठी तयार झाले .भले हा विसरण्याचा काळ सध्या पाच वर्षाचा असेल. मात्र सत्ताप्राप्तीसाठी पॉलिटिकल फिलॉसॉफी किंवा राजकीय तत्त्वज्ञान बाजूला ठेवून साधनसुचिता विसरून सत्ता हे अंतिम उद्दिष्ट प्राप्त करणे महत्त्वाचे ठरते. महाआघाडीतला तिसरा पक्ष एका कुटुंबाच्या विचारधारेवर चालत असल्यानेच आज हे तिघेही एकत्र असणे हा महत्त्वाचा भाग आहे. स्वबळाच्या नार्याने उद्या काय होईल याची पुसटशी रेषा आज दिसत असली तरी राजकीय, व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा कोणाला किती अपरिहार्यते पर्यंत वाकवेल यावर निवडणूकपूर्व व निवडणुकोत्तर समीकरणे उदयाला येतील .समजा उदा.काँग्रेस स्वतंत्रपणे लढले आणि राष्ट्रवादी शिवसेना या दोन पक्षांना आघाडी करून सत्तास्थापने इतपत जागा मिळाल्या तर काँग्रेसला ते निवडणुकोत्तर आघाडीत सहभागी करून घेतील का हा प्रश्न आहे .अर्थात पुन्हा एकदा लोकसभा ,विधान परिषद ,राज्यसभा ,महापालिका, राष्ट्रपती निवडणूक अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपर्यंत ही समीकरणे कशी असतील हे परिस्थितीवर अवलंबून असेल. आघाडीत बिघाडी अन् बिघाडीत आघाडी असेल. असो सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे आहेत एकदा गृहमंत्री श्री. अमित शहा यांच्याबरोबर बंद दाराआड चर्चेने काय झाले हे राज्याच्या जनतेने पाहिले आहे. आता पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या बंद दाराआडच्या चर्चा काय घडणार याच्या प्रतीक्षेत राज्यातील जनता आहे.तसेही राजकारण श्रीमंतांची ,कुटुंबाची मक्तेदारी झाली आहे. निष्ठा ,तत्त्वप्रणाली, प्रामाणिकपणा, सकारात्मक, विधायक, रचनात्मक आणि आणि मुख्य म्हणजे लोककल्याणासाठी लोकशाही ही संकल्पना सूक्ष्मदर्शक किंवा दुर्बिणीच्या सहाय्याने ओळखण्याच्या दिवसात किमान मराठी ,मध्यमवर्गीय ,वडापाव ,भोजन थाळी किंवा हिंदुत्व या मध्यमवर्गीय, निम्नमध्यमवर्गीय यांच्या जीवनावश्यक प्रतिकांवर सत्ताधारी सध्या सत्तेत आहे हेही नसे थोडके. मध्यमवर्गियांना समाधानी ठेवण्यात शिवसेनेला यश लाभो ही वर्धापन दिना निमित्त प्रार्थना.
तेव्हा तूर्तास बास..!
.
मधुसूदन पतकी
कार्यकारी संपादक
महाराष्ट्र न्यूज