महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : कोरेगाव
मा. भिमराव पाटील (काका) युवा मंचचा उपक्रम
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सध्या जिल्ह्यामध्ये चिंतेचा विषय बनला आहे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत देखील झपाटय़ाने वाढ होताना दिसत आहे दरम्यान कोरोनावर ठोस असा औषधोपचार उपलब्ध नसल्याने आता रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे कोविड १९ या रोगाचा संसर्ग थांबवण्यासाठी भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांची शिफारस केली आहे
याच पार्श्वभूमीवर वाठार कि येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या मा भिमराव पाटील (काका) युवा मंचच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत या गोळ्यांचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले या गोळ्यांच्या वाटपामुळे रोगप्रतिकारक शक्ती नक्की वाढेल व याचा फायदा कोरोनाच्या या लढ्यात नक्की होईल असा विश्वास युवा मंचच्या सदस्यांनी व्यक्त केला जिल्हा परिषद सदस्य मा श्री भिमराव पाटील (काका) यांचे या कामी मोलाचे मार्गदर्शन लाभले. यापुढेही वाठारकरांसाठी कोरोना लढ्यात लागेल ते सहकार्य व मदत करण्याची ग्वाही युवा मंचच्या सदस्यांनी दिली.