दिनांक 10: रोजी वाढे गावात रस्त्याच्या मधोमध साय. साडेचार च्या सुमारास माल वाहतूक करणारा कंटेनरचा टायर पंक्चर झाल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा 2 तास वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली.
शनिवार दिनांक 10 रोजी सायंकाळी साडेचार वाजता वाढे गावात माल वाहतूक करणारा कंटेनरचा टायर पंक्चर झाल्यामुळे वाहनांची दुतर्फा मोठी रांग लागली होती. साडेचार च्या सुमारास नोकरदार मंडळीची घरी जाण्याची वेळ असते. त्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागल्याने नाहक त्रास झाला. सातारा लोणंद रस्त्याला अवजड वाहनांची वर्दळ काही नवीन बाब नाही. अवजड माल वाहतूक करणारे वाहनधारक टोल वाचवण्यासाठी सातारा लोणंद रस्त्याला मोठ्या प्रमाणात वाहतूक करतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीला व अपघाताला सामोरे जावे लागते. वाढत्या वाहतुकीने स्थानिक नागरिकांना ये जा करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसेच सातारा लोणंद रस्त्यालगत शाळा महाविद्यालय आहेत. त्यामुळे भविष्यात शाळकरी मुलांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. या वाढत्या वाहतुकीतून पर्यायी मार्ग काढावा अशी मागणी स्थानिक नागरीक करत आहेत.