पीडिता व पिडीतेची आई सरकार पक्षाशी फितूर झाल्यावर ही न्यायलयाने दिला निकाल.
२०१६ मधील प्रकरणात खामगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल.
जिल्ह्यातील संग्रामपूर पोलिस स्थानकाअंतर्गत गावातील दलीत समाजातील एका १४ वर्षीय बालिकेवर मशिदीत बोलावून तिच्यावर मशिदीच्या मौलनाने लैंगिक अत्याचार केला होता…या प्रकरणाचा गुन्हा नोंदवून तात्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र साळुंखे यांनी योग्य तपास करत प्रकरण न्यायप्रविष्ठ केलं होत. या प्रकरणी न्यायालयाने ११ साक्षीदार तपासले मात्र यातील पीडिता व पिडितेची आई या दोन्ही मुख्य साक्षीदार सरकारी पक्षाला फितूर झाल्या होत्या तरीही मा. न्यायालयाने इतर महत्वाच्या साक्षी नोंदवून आरोपी मौलाना सय्यद नाजिम सय्यद अब्दुल कय्यूम या मशिदीत मौलाना म्हणून काम करणाऱ्या आरोपीला डबल आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सोळंके यांनी शिताफीने तपास केल्याने आज आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा झाली आहे.
आज जिल्हा न्यायाधीश -1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश खामगांव, वैरागडे मॅडम यांनी कोर्टात सुरु असलेले अपराध नं. 275/2016, स्पेशल सेशन केस न. 08/2017 मधिल आरोपी नामे सय्यद नाजीम सय्यद अब्दुल कय्युम, वय 33 वर्ष रा. टुनकी बावनबीर, ता. संग्रामपुर यास मा. न्यायालयाने कलम 376(2)भादवी नुसार हा आजन्म कारावास व .10000 रु दंड, व दंड न भरल्यास एक वर्ष शिक्षा , क 506 भादवी मध्ये एक वर्ष शिक्षा व 1000 रु दंड व दंड न भरल्यास एक महिना शिक्षा, क 3(1)(w) अजाजअप्रका मध्ये 06 महिने शिक्षा व 1000 रु दंड, व दंड न भरल्यास एक महिना शिक्षा, 3(2)(5) अजाजअप्रकामध्ये आजन्म कारावास व 1000 रु दंड व दंड न भरल्यास एक महिना शिक्षा अशी शिक्षा सुनावली आहे.
































