राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल यांच्या वतीने आज अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.
जगभरातल्या सत्तावीस भाषेमध्ये यांच्या साहित्याचा डंका आजही वाचतोय आणि रशिया सारख्या प्रगतशील देशाने कर्तृत्वाचा सन्मान सत्कार केला व आपल्या भारत देशाच्या आणि विशेषत संयुक्त महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे. देशातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या पुस्तकावर आजही अभ्यास केला जातो.
सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, लोककला कथा कादंबऱ्या आजच्या पिढीला ही प्रेरणादायी ठेवतात. ते आपल्या भारत मातेचे सुपुत्र महा कर्तुत्वान साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे त्यांना त्यांच्या मरणोत्तर भारत सरकारने त्यांना भारतरत्न जाहीर करावं अशी मागणी संसदेमध्ये सातत्याने आपण करावी अशी विनंती सिक्कीम चे माजी राज्यपाल सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्रीनिवास पाटील यांना सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख सारंग पाटील बाबा , राष्ट्रवादी ओबीसी सेल सातारा जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी, हजाररमाची गावचे माजी उपसरपंच सतीशराव जांभळे, राष्ट्रवादीचे युवा नेते राज भाई पठाण इतर कार्यकर्ते उपस्थित होते.