वालचंदनगर प्रतिनिधी दिः२६ वार्ताहर
जंक्शन ता, इंदापूर येथील साईनगर परिसरात एका तरुणाला कोरोनाची लागण झाले असल्याने सर्व परिसर सील करण्यात आले आहे. संबंधित कोरोना पाझिटीव्ह र्ग्णावर मुंबई येथील टाटा मेमोरीयल रूग्णालयात उपचार सुरू आहे.हा संबंधित तरूण कोणाच्या संपर्कात आला याचा कसून चौकशी चालू आहे. वालचंदनगर जंक्शन पोलीस ठाण्याच्या हाद्दीत पहिल्यांदाच घोरपडवाडी येथे एक महिला पाझिटीव्ह सापडले नंतर जंक्शन साईनगर येथे दुसरा पाँझिटीव्ह सापडला असल्याने तालुक्याच्या पश्चिमेकडील भागात कोरोनाचा शिरकाव पसरताना दिसत आहे. त्यामुळे सर्वत्र कडकडीत बंद करण्यात आले आहे.तर संबंधित साईनगर येथील ५ जणांचे स्वँब घेण्यात आले आहेत.या पाचही जणांना इंदापूर येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. साईनगर जंक्शन कंटोमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असल्याची माहिती इंदापूर तालुक्याचे तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.
वालचंदनगर जंक्शन पोलिस ठाण्याच्या माध्यमातून साईनगर कंटोमेंट झोन तर जंक्शन , आनंदनगर , लासुर्णे , अंथुर्णे , नऊदारे हा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.या परिसरातील अतिआवश्यक सुविधा वगळता सर्व दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी माहिती दिली. संबंधित तरूण मुंबई येथील टाटा मेमोरीमल रूण्णालयात उपचार सुरू असून संपर्कातील ५ जणांचे स्वँब घेण्यात आलेले आहेत. या पाचही जणांना इंदापूर येथे क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे दिलीप पवार यांनी सांगितले .
जंक्शन साईनगर परिसरात शुकशुकाट असून नागरिकांत घबराहाट पसरले आहे.ग्रामीण भागात मुंबई पुणे येथून आलेल्याची संख्या जास्ती असल्याने ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव फैलावत असल्याचे जंक्शन साईनगर अंथुर्णे नऊदारे येथील नागरिकातून चर्चा सुरू आहे. वालचंदनगर, रणगांव ,कळंब या भागातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दक्षता खबरदारी घेण्याची विशेष मोहिम राबले जाणार असून परगावातील येणाऱ्याना गावात बंदी घालण्यात येणार आहे. रणगांवला बफर झोन घोषित करण्यात आले असल्याने दक्षता म्हणून पुन्हा घरोघरी जाऊन सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येणार आहे असे सरपंच सुषमा रणमोडे यांनी माहिती दिल
































