महाराष्ट्र न्यूज/ मसूर : दुषित पिण्याच्या पाण्यामुळे अनेकदा साथीचे आजार पसरलेल्या घटना घडत असतात. त्यामुळे अनेक जण अचानक आलेल्या या साथीचे बळी ठरत असतात. मात्र कराड तालुक्यातील उत्तरेकडील टोकावर असलेल्या पाडळी गावाने सलग पाच वर्षे पाणी पुरवठ्यासाठीचे हिरवे कार्ड मिळवले असून जिल्हा परिषदेमार्फत नुकतेच या ग्रामपंचायतीला चंदेरी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे पाडळी ग्रामपंचायतीने जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतीसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. त्यानिमित्ताने ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावात पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते ग्रामसभेत करण्यात आला.
कराड तालुक्याच्या उत्तरेकडील टोकावरील पाडळी हे गाव होय. या गावाला पाणी टंचाईच्या झळा नेहमीच बसत असत. त्यामुळे पाण्याचे महत्व संपूर्ण गावाने ओळखले आहे. या ग्रामपंचायतीने सन 2016 ते2020 अखेर सलग पाच वर्ष गावात कोणत्याही साथीच्या आजाराचा प्रसार होऊ दिला नाही. यासाठी विशेष प्रयत्न केले होते. तसेच स्वच्छ शुद्ध आणि योग्य प्रमाणात पाण्यात मिसळावयाच्या घटकांचा वापर केला होता. त्यामुळे सातारा जिल्हा परिषद अंतर्गत पिण्याचे पाणी स्त्रोत स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत सलग पाच वर्ष ग्रामपंचायतीस हिरवे कार्ड मिळाले आहे. खरंतर पाणीपुरवठ्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यात महत्त्वाची भूमिका असते. ती भूमीला पाडळी ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी सदाशिव मारुती कुंभार यांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने व्यवस्थित पार पाडली.
यावेळी सरपंच सौ. सुरेखा जाधव, उपसरपंच सुहास जाधव, ग्रामपंचायत सदस्य राहुल जाधव, सौ. पुष्पा जाधव, सौ. विद्या शिंदे, ग्रामसेवक जे. एस. ढाणे आदी मान्यवरांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा कर्मचारी सदाशिव कुंभार यांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला. ग्रामपंचायतीने सलग पाच वर्षे हिरवे कार्ड मिळवून चंदेरी प्रमाणपत्र मिळवत जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतीसमोर वेगळा आदर्श ठेवला आहे.
सलग पाच वर्षे मिळवले हिरवे कार्ड.
ग्रामपंचायतीने केला पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा सत्कार.
जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायत समोर ठेवला आदर्श.