फलटण : साखरवाडी ता. फलटण येथून 19 वर्षाची युवती हरवली असल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौ. सरस्वती अविनाश जगताप, वय 35, रा. सात सर्कल, साखरवाडी, ता. फलटण यांनी फिर्याद दिली असून कुमारी साक्षी अविनाश जगताप, वय 19, रा.सात सर्कल, ता. फलटण ही 8 सप्टेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास राहते घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेलेली आहे. त्यामुळे मुलगी हरवली बाबतची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. पोलीस हवालदार बि.आर साबळे पुढील तपास करत आहेत.






















