महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
जेष्ठ नागरिक आणि इतर सर्व नागरिकांसाठी केंद्र सरकारने एक उत्कृष्ट कंसल्टीग योजना सुरू केली आहे.विशेषत: रक्तदाब, मधुमेह इत्यादी असणाऱ्या वृद्ध व्यक्तींस ओपीडीसाठी त्वरित रुग्णालयात नेले जाऊ शकत नाही.
जरी, नेले तरी तेथे धोका अधिक आहे. डोकेदुखी, शारीरीक वेदना यांसारख्या छोट्या समस्यांसाठी ते घरीच उपचार शोधतात, पण रूग्णालयात जायला तयार नसतात.या साठी आपण Google Chrome वर खालील लींक द्वारे यावर पोहोचू शकता. ही केंद्र सरकारची वेबसाइट https: //www.eSanjeevaniopd.in आहे.
1 रुग्णांच्या नोंदणीची निवड करा.
2. तुमचा मोबाईल क्रमांक टाइप करा. रजिस्टरेशन साठी मोबाईल वरील ओटीपी टाईप करा.
3. रुग्णाचे तपशील आणि जिल्हा प्रविष्ट करा. आता, आपण ऑनलाइन डॉक्टरांशी कनेक्ट व्हाल. त्यानंतर, व्हिडिओद्वारे आपण आपल्या कोणत्याही आरोग्याच्या समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. डॉक्टर औषध ऑनलाइन लिहून देतील.आपण ते वैद्यकीय फार्मसी दुकानात दाखवून औषध घेऊ शकता. ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे.
आपण दररोज रविवारसह सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत ही सेवा वापरू शकता.