वाई : महाराष्ट्र राज्य मावळा प्रतिष्ठान स्वर्गीय शिवभक्त सागर दादा मालुसरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुरुवार दि. १६ सप्टेंबर २०२१ रोजी स्पोर्टीका फिटनेस क्लब वाई या फिटनेस क्लब चा भव्य शुभारंभ वाई खंडाळा महाबळेश्वर चे जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संजय चव्हाण, मिस्टर इंडिया, अतुल आंब्रे, अनिल बिलावा मिस्टर इंडिया, मिस्टर महाराष्ट्र, मिस्टर मुंबई, सुदर्शन खेडेकर मिस्टर इंडिया, मिस्टर महाराष्ट्र, मिस्टर ठाणे यांच्या शुभहस्ते वाई येथे पार पडला.
हा कार्यक्रम वाई नगरपालिका नगराध्यक्ष अनिल सावंत, वाई पंचायत समिती उपसभापती पैलवान विक्रांत( भैय्या ) डोंगरे, पोलीस निरीक्षक वाई, बाळासाहेब भरणे, रमेश आप्पा गायकवाड,डॉक्टर नितीन कदम, चरण गायकवाड, आनंद चिरगुटे,गणेश अनपट, बापू भोसले, संतोष शिंदे, अप्पासाहेब मालुसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला .सर्वच मान्यवरानी संजय (बाबा) मालुसरे सर यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले व स्पोर्टीका फिटनेस क्लबच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
































