माण : माण तालुक्यातील मलवडी बस स्थानक परिसरात तडीपार केलेला आरोपी फिरत असल्याची माहिती सपोनि संतोष तासगावकर व त्यांच्या टीमला पेट्रॉलिंग करत असताना मिळाली. दीपक नामदेव म्हसुगडे (वय 24 वर्षे रा. नवलेवाडी, पो. मलवडी, ता. माण, जि. सातारा) असे सदर तडीपार केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक सातारा यांनी सदर आरोपीला माण, खटाव, कोरेगाव, फलटण या चार तालुक्यातून एका वर्षासाठी ताडीपार केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस तात्काळ मलवडी बस स्थानक परिसरात सापळा रचुन शिताफीने सदर आरोपीला ताब्यात घेतले. सदर आरोपीवर म. पो. आधि. क. १४७ नुसार कारवाई करण्यात आली आहे.
सदरच्या कारवाईत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, सहा.पो.फौ हांगे, पो.हवा केंगले, पोलीस नाईक बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल कदम, चालक सहा.पो.फौ निर्मल यांनी सहभाग घेतला होता. पुढील तपास पोलिस नाईक रवींद्र बनसोडे करीत आहेत.