ग्रामीण भागात जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाकडून सर्व गावात मालमत्ता (प्रॉपर्टी) कार्ड उपलब्ध नाही. स्वामित्व योजनेद्वारे कार्यवाही सुरू आहे. त्यास अजून काही काळ लागणार आहे. त्यामुळे गावातील लोकांना कर्ज घेण्यासाठी गैरसोय होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत नमुना 8 हा मालकी हक्क दर्शविणारा दस्त नाही. तरीसुद्धा मालकाच्या नावाची नोंद ग्रामपंचायत नमुना 8 मध्ये असते.
त्यामुळे 6 डिसेंबर 1917 चे शासन पत्र रद्द करून ग्रामपंचायत नमुना 8 वर बोजा चढवण्यासाठी अनुमती देत असल्याचे परिपत्रक 3 सप्टेंबर 20 रोजी महाराष्ट्र शासनाचे उपसचिव यांच्या सहीने काढण्यात आले आहे. आणि राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत नमुना 8 वर बोजा चढविण्याचा येणार आहे.