फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार यांचे ग्रामस्थांना आवाहन
फलटण : फलटण तालुक्यातील नागरिकांनी आपली कराची रक्कम 30 सप्टेंबर पूर्वी जमा केल्यास पाच टक्के सवलत दिली जाते. या सवलतीचा लाभ घेऊन ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याचे आवाहन फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार यांनी केले आहे.
फलटण तालुक्यातील 101 ग्रामपंचायती मधील 12 हजार 286 खातेदाराकडून एक कोटी 88 लाख 63 हजार 711 रुपये ग्रामपंचायत कर व पाणीपट्टी वसुली येणे बाकी आहे. त्यापैकी 15 ते 24 सप्टेंबर दरम्यान 101 ग्रामपंचायतीमधील 1046 खातेदाराकडून 18 लाख 80 हजार 486 रुपये वसूल झाला आहे. 25 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोक न्यायालयाच्या माध्यमातून 96 ग्रामपंचायतीमधील 310 खातेदाराकडून सहा लाख 72 हजार 171 रुपये कर वसुली झाली आहे. म्हणजे एकूण 96 ग्रामपंचायतीमधील1356 खातेदारक्डून 25 लाख 52 हजार 657 रुपये कर वसुली झाली आहे.
सुमारे एक कोटी 63 लाख 11 हजार रुपये कर वसुली बाकी असून गावांमधील आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, स्वच्छता आदी नागरी सुविधांसाठी कर वसुली आवश्यक बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायत कराची रक्कम सप्टेंबर अखेर पर्यंत भरून करांमध्ये दिल्या जाणाऱ्या सवलतीचा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावे असे आवाहन फलटण पंचायत समिती च्या गटविकास अधिकारी डॉक्टर अमिता गावडे पवार यांनी केले आ