वाई: लोणंद येथील शिवांजली उद्योग समूहाचे शिल्पकार व मुरूम (ता-फलटण) गावचे राजे गटाचे नेते राजेश उर्फ राजूशेठ शिंदे यांचा वाढदिवस कोरोना महामारी मुळे साधेपणाने साजरा करण्यात आला.
कोरोना पार्श्वभूमीवर राजू शेठ यांनी आपल्या मित्र परिवार व सर्व कार्यकर्ते यांना आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करणार असल्याचे कळवले होते. त्यामुळे राजू शेठ यांचे घरातील मंडळींनी औक्षण केल्यानंतर त्यांनी आपले माता पिता यांचे आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात केली. सर्व कार्यकर्ते, मित्र परिवार यांच्या फोनवरून शुभेच्छा स्वीकारल्या.
राजू शेठ यांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, फलटणचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर, माजी उपसभापती महादेव (दादा) बोंद्रे, श्रीराम कारखान्याचे संचालक रमेश (काका) बोंद्रे व इतर नेतेमंडळी मित्रपरिवार यांनी फोन वरून शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या निमित्ताने नेतेमंडळी व राजे गटाचे मुरूम येथील कार्यकर्ते यांनी दिलेल्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करतो व, या शुभेच्छांच्या जोरावर व्यवसायात आणि मुरूम गावच्या राजकारणात काम करण्यास बळ वाढणार असल्याचे राजू शेठ यांनी सांगितले.

























