सुनील निंबाळकर /पुणे प्रतिनिधी
स्वारगेट आगारातून श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक समारोप सोहळ्यासाठी रायगड पायथा येथे जाण्यासाठी दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी स्वारगेट आगारातून सकाळी ०६.४६ वाजता प्रवाशांच्या सोयीसाठी निमआराम बस आरक्षणास उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
तसेच दि.२०.१२.२०२० पासून प्रत्येक रविवारी स्वारगेट आगारातून स्वारगेट-रायगड दर्शन या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी निमआराम बस सुरू करण्यात येत आहे परत स्वारगेट-रायगड दर्शन ही फेरी स्वारगेट येथून सकाळी ०६.४५ वाजता सुटणार असून सदर बस रायगड दर्शन करून स्वारगेट येथे १८.४५ वाजता पोहोचेल सदर प्रश्न फक्त तिखटाचे प्रति प्रवासी प्रवास भाडे ६१०/- रुपये इतके आहे. सदर फेरीचे आरक्षण करण्यासाठी स्वारगेट- रायगड दर्शन या सांकेतिक कोड चा वापर करून आरक्षण करावे.
सदरच्या बसेस ऑनलाइन आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आले असून,महामंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेत स्थळावर व इतर संकेतस्थळावर आरक्षण करता येईल सदर सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय पुणे चे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले आहे.