पाटण : पाटण तालुक्यातील कृषी कार्यालयाला दहा दिवसात फलक न लावल्यास शेतकरी भिक मांगो आंदोलन करून फलकासाठी पैसे देतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाटण तालुकाध्यक्ष विकास हादवे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
पत्रकात म्हंटले आहे की,शेतकऱ्यांसाठी असणारे कृषी कार्यालय कोठे आहे याबाबत तालुक्यातील शेतकरी अनभिज्ञ आहेत. कार्यालय काळोली येथे असले तरी फलक नसल्याने नक्की कार्यालय कोठे आहे हे शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.तसेच खेडेगावातील शेतकरी चुकून कार्यालयात गेलाच तर अनेक वेळा अधिकारी उपस्थित नसतात त्यामुळे शेतकऱ्यांना माहिती मिळत नाही. तालुक्याच्या कृषी विभागाची जवळपास ४० एकर शेती आहे. पण गेल्या ४ वर्षात एकही बीज रोपण याठिकाणी झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना बीज रोपण विषयी माहिती देण्यात यावी व कार्यालयाचा फलक दहा दिवसात लावावा, अन्यथा तालुक्यातील शेतकरी भिक मागून फलकासाठी पैसे देती असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.






















