वाई : चांदक गावात कायम समाजकार्य करणारे युवा नेतृत्व मनोज भिलारे हे प्रत्येक वर्षी वाढदिवसनिमित्त आपण समाजच काहीतरी देण लागतो, या भावनेने सामाजिक कार्य करतात. याच प्रमाणे यावर्षी ही वाढदिवसानिमित्त मोफत नेत्रतपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर व सवलतीच्या दारात चष्मे वाटप अश्या विविध सामाजिक व विधायक कार्यक्रमांनी संपन्न झाला तसेच प्राथमिक शाळेच्या रंगकामासाठी मनोज भिलारे व अजित जाधव यांनी रोख रक्कम स्वरूपात मदत केली.
या उपक्रमाचा लाभ जवळपास ११० लोकांनी लाभ घेतला. हा उपक्रम ए. व्ही. देसाई रुग्णालय पुणे यांचे डॉ. शाहबाज शेख, सुरज लोखंडे, सोनाली शिंगटे, प्रतिक्षा कांबळे यांच्या माध्यमातून शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाले.
वाई तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष अल्पना यादव यांनी मनोगतातून त्यांना शुभेच्छा दिल्या व उपक्रमाचे कैतुक केले.
या वेळी चांदक गावाच्या सरपंच सोनाली संकपाळ, उपसरपंच मोहन मोरे, ग्रा. प. सदस्य गणेश संकपाळ, सोनाली जाधव, दत्तात्रय भिलारे, विठ्ठलराव भिलारे पाटील, सुनिल दरेकर, अक्षय जाधव, आशिष संकपाळ, गणेश रोमन, राहुल भिलारे, रमेश संकपाळ, ऋषिकेश भिलारे, अक्षय जाधव, ऋतिक भिलारे, भैरवनाथ महिला व पुरुष बचत गट व शिवतेज गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.