महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :बिदाल
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण व सातारा जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी केंद्राची शिक्षण परिषद नुकतीच पार पडली.
शिक्षण परिषदेमध्ये होस्ट म्हणून म्हणून श्री.भाग्यश्री गायकवाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळशी यांनी उत्कृष्ट कार्य पार पाडले. प्रास्ताविक रामभाऊ खाडे यांनी केले. Covid-19 काळात गुणवत्तापूर्ण ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणासाठी शिक्षक सक्षमीकरण यासाठी मार्गदर्शन सतेशकुमार माळवे सर यांनी केले. तर आदर्श शिक्षिका श्रीम.सुरेखा गंगाराम वंजारी यांनी शैक्षणिक दिनदर्शिका सप्टेंबर ते नोव्हेंबर वीसचा वापर व मार्गदर्शन केले.
कोविड काळात उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या शाळा व शिक्षक सादरीकरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरगरवस्तीच्या उपशिक्षिका सौ.अंजली रामभाऊ खाडे यांनी केले . कोविड काळात विद्यार्थ्यांशी संवाद अनौपचारिक पद्धतीने मूल्यमापनासाठी अध्ययन निष्पत्ती वर आधारित प्रश्न निर्मिती प्रश्न पेढी तयार करणे अतिशय उत्कृष्ट सादरीकरण श्रीम. दिपाली फरांदे यांनी केले. परिषदेसाठी श्रीम. सोनाली विभूते गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती माण,श्रीम. संगीता गायकवाड शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती माण व केंद्रप्रमुख नारायण आवळे यांचे मार्गदर्शन लाभले.

समारोप व आभार हरहुन्नरी अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्व श्री. सोपानराव पोळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मीनगर यांनी मानले .शिक्षण परिषद खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली






















