महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सातारा :
दरवर्षी 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान वनविभागातर्फे वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो .यावर्षी कोरोनामुळे उदभवलेल्या परिस्थिती मुळे शाळा महाविद्यालय तसेच गावामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम करणे शक्य नसल्याने ऑनलाईन वेबिनार, क्षेत्र भ्रमंती ,अभ्यास सहल , ग्रामस्थ समुपदेशन, औषधी वनस्पती लागवड विषयक चर्चा यांचे आयोजन अशा स्वरूपात साजरा करण्यात आला. परिक्षेत्रातील उचाट व दरे या गावामध्ये बांबू लागवडीस प्रोत्साहन म्हणून स्थानिक बांबू प्रजातीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
दि.2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती व वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून वनपरिक्षेत्र कार्यालय व परिसर , वेळे कुटी, मेट इंदोली संकुल, रघुवीर घाट येथे श्रमदानाद्वारे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली . वलवण येथील निवासी शाळेत दि.3 ऑक्टोबर रोजी मानव वन्यजीव संघर्ष व अन्न साखळीतील वन्यजीवांचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळे कुटी येथे वृक्षारोपण करण्यात आले.वेळे (ढेण) येथील ग्रामस्थासोबत चर्चा करून वन्यप्राण्याकडुन होणारी पिक नुकसान व पशुधन हानी ची भरपाई त्वरीत मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया व कागदपत्रे याविषयी समुपदेशन केले.
दि.5 ऑक्टोबर रोजी परिक्षेत्रातील कर्मचारी यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर कार्यालयाद्वारे आयोजित वेबिनार मधे सहभाग नोंदविला. मुनावळे ग्रामस्थांशी चर्चा करून औषधी वनस्पती लागवड प्रक्रिया ,त्यामधील संधी व फायदे याविषयी समुपदेशन करण्यात आले .तसेच बामणोली व दापोली परिक्षेत्रातील कर्मचारी,चिपळूण चे निसर्ग प्रेमी व अभ्यासक निलेश बापट व कोकरे यांच्या समवेत दुर्ग चकदेव येथे अभ्यास भ्रमंती करून माहिती घेतली.