गतवर्षी प्रमाणे या वर्षीही देखील खंडाळा तालुक्यातील इनरव्हील क्लब लोणंद यांच्या वतीने खास महिलांसाठी गणेशोत्सव काळात गौरी गणपती सजावट (आरास) स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.कोरोना रोगाचा पार्श्वभूमीवर ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात घेण्यात येणार आहे.या स्पर्धेत सहभागी होत असताना गौरी गणपती सजावटीचा फक्त 1 मिनिटांचा video काढून
इनरव्हील क्लबच्याच्या सदस्यांकडे पाठविण्याचा आहे.
तसेच यांमध्ये पर्यावरण पुरक व सध्य स्थिती ला अनुसरुन शक्य तो सजावट असल्यास त्या सजावटीसाठी विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.अशी माहिती इनरव्हील क्लब लोणंदच्या अध्यक्षा डॉ.स्वाती शहा यांनी दिलेली आहे.अंतिम निर्णय परिक्षका म्हणून डॉ.स्वाती शहा यांच्या सूचनेनुसार सरिता वर्धमाने ,
ममता अरोरा, जयश्री यादव या असणार आहेत.तरी
महिलांनी या स्पर्धेसाठी तयार राहून आपल्या कलागुणांना वाव द्या असे म्हणत या इनर्व्हील क्लबच्या अध्यक्षा स्वाती शहा यांनी सहभागी होण्याचे आवाहन केलेले आहे.






























