फलटण : फलटण तालुक्यातील सरडे येथे पडीक शेतात क्रिकेटचे सामने भरवण्यात आले होते. यावेळी मॅच हरल्याच्या कारणावरून एका व्यक्तीला शिविगाळ व मारहाण केली असल्याबाबत ७ जणांन विरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळलेली माहिती अशी की, सरडे गावाच्या हद्दीत गुरुवारी दि. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास शिवाजी बेलदार यांच्या पडीक शेतात क्रिकेटचे सामने खेळण्यास हर्षवर्धन दाजीराम बेलदार (वय २५,रा. सरडे, ता. फलटण) गेले होता. यावेळी सुनील लाला चव्हाण, सोमनाथ छगन चव्हाण, गणेश दत्तात्रय चव्हाण व इतर अनोळखी ४ जणांनबरोबर क्रिकेट मॅच मिळाली व ती मॅच हरले.
या कारणावरून हर्षवर्धन बेलदार याला शिविगाळ देत होते, तुम्ही मला शिव्या का देता असे विचारल्यामुळे चिडून शिवीगाळ व दमदाटी करत यातील सुनील चव्हाण याने पाठीमागून जोरात लाथ मारल्यानंतर आरोपी खाली पडला, त्यावेळी सोमनाथ चव्हाण आणि गणेश चव्हाण फिर्यादीच्या अंगावर बसून गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गणेश चव्हाण व अनोळखी चार इसम यांनी शिवीगाळ दमदाटी करत मारहाण केली, असल्याचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक फौजदार सुधाकर सूर्यवंशी करत आहेत.