महाराष्ट्र्र न्यूज प्रतिनिधी :
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात ढगफुटी …आसनगावं, अनपटवाडी, राऊतवाडी,शहापूर परिसरात धुवाधार पाऊस….
अडीचतास पाऊसाची रिपरिप: घेवडा,बटाटा,सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान,शेतातील बांध, नालाबंडीगची मोठ्या प्रमाणात फुटाफूट….
पिंपोडे बुद्रुक,: शेतकऱ्यांची घेवडा काढणीची लगबग सुरु असतांना, काल कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात आसनगावं, अनपटवाडी, राऊतवाडी,शहापूर व परिसरात तब्बल अडीचतास ढगफुटी सारखा वळीवाचा पाऊस पडल्याने उत्तर भागांतील पिकांचे आणि शेताचे मोठे नुकसान झाले आहे.
शुक्रवारी साडे पाचच्या सुमारास सुरु झालेला वळीवाचा पाऊस रात्री आठ वाजेपर्यंत जोरात पडत होता.या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळवून देणाऱ्या घेवडा नगदी पिकाच्या काढणीची व मळणीची लगबग सुरु आहे.शेतकऱ्यांची रास व घेवडयाचे ढिग व गावली शेतात तशीच पडून आहेत. अद्याप ऐंशी टक्के सराई बाकी आहे. मात्र काल झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची अक्षरशः धांदल उडाली. तब्बल अडीच तास धुवाधार झालेल्या पावसाने घेवडा, बटाटा, सोयाबीन व इतर अतोनात पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतात पिक पाण्याखाली गेली.शेताचे बांध व नालाबडिंग फुटले आहेत.रस्ते वाहून गेले आहेत.अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.आसनगावं, अनपटवाडी, राऊतवाडी,शहापूर गावांच्या परिसरात पिकांचे व शेताचे मोठे नुकसान झाले आहे. ओढे भरुन वाहू लागले आहेत. गेल्या सतरा वर्षात असा पाऊस कधीही झाला नव्हता अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करतं आहेत.तर भागात वळीवाच्या पावसाने घेवडा पिक धोक्यात आली आहे.पावसाने घेवडा कुजण्याची दाट शक्यता आहे. ओला घेवडा सुखवताना आणि व्यापाऱ्याला विकताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येणार आहे.