महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : (काेरेगाव)
काेराेना बाधितांची मनाेभावे सेवा करणाऱ्या काेरेगांव काेविड केअर सेंटरला काेरेगांव शहर विकास मंचचे अध्यक्ष व खरेदी विक्री संघाचे संचालक किशाेर बर्गे यांनी उपयुक्त साहित्य भेट दिले.
याप्रसंगी बाेलताना किशाेर बर्गे म्हणाले, काेरेगांव तालुक्यातून काेराेना हद्दपार करण्यासाठी काेरेगांव काेविड केअर सेंटरने अतिशय प्रभावी काम केले असून डाॅ. राजन काळाेखे यांच्या मार्गदर्शनाखाली चॅलेंज अॅकॅडमीत उभारलेले हे काेविड केअर सेंटर संपूर्ण काेरेगांव तालुक्यातील रुग्णांची मनाेभावे सेवा करीत आहे. या केअर सेंटरला काेरेगांव विकास मंचचे कायम सहकार्य राहिल असा विश्वासही किशाेर बर्गे यांनी व्यक्त केला.
यावेळी काेरेगांव विकास मंचच्या वतीने अध्यक्ष किशाेर बर्गे यांच्या हस्ते वाफ घेण्याची उपकरणे, बेडशिट, सॅनीटायझर, मास्क आदी साहित्य यावेळी काेराेना केअर सेंटरला देण्यात आले.
कार्यक्रमास काेराेना केअर सेंटरचे नियंत्रक डाॅ. राजन काळाेखे, निवृत्त वाहतुक निरीक्षक रामचंद्र बाेतालजी, विकास मंचचे कार्याध्यक्ष दिलीपराव बर्गे, राजु बागवान आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती हाेती.
यावेळी बाेलताना डाॅ. राजन काळाेखे यांनी कृतज्ञता व्यक्त करुन काेरेगांव विकास मंचने काेरेगांव काेविड केअर सेंटरला दिलेल्या या उपयुक्त भेटीबद्दल समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी काेरेगांव विकास मंचचे सदस्य तसेच काेरेगांव काेविड केअर सेंटरचे कर्मचारी, नगरपंचायत कर्मचारी उपस्थित हाेते.