पिंपोडे बु।। : करंजखोप, ता. कोरेगाव येथील शारदाबाई गोविंदराव पवार या विद्यालयातील विध्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेसाठी बेंच आणि शाळेसाठी इतर साहित्याची गरज होती. ही गरज ओळखून सोळशी, ता. कोरेगाव गावचे सुपुत्र व शाळेचे माजी विद्यार्थी चंद्रशेखर यादव सोळस्कर पोलीस अधिकारी कर्जत यांनी वासुदेव फर्निचर कर्जत यांचे माध्यमातून सोळशी येथील भाग शाळेसाठी सुमारे दीड लाख रुपये किमतीचे फर्निचर देणगी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री लावंड सर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
या वेळी चंद्रशेखर सोळस्कर यांचे वडील मोहन यादव सोळस्कर, दयाराम बापू, ,वासुदेव फर्निचर चे मॅनेजर साखरे, शाळेचे प्राचार्य लावंड, ज्येष्ठ शिक्षक विलास जगताप, सोळशीचे उपसरपंच आकाश सोळस्कर तसेच सेवक वर्ग ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.