उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग जावळी यांच्या कार्यालयामार्फत कोंडवे तालुका गावचे हद्दीत राज्य मार्गावर सुरू असलेल्या विनापरवानगी खोदकाम करून शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले प्रकरणी तक्रार नोंदवण्यात यावी असे पत्र सातारा तालुका पोलीस स्टेशन यांना पाठवले असून याबाबत पोलीस स्टेशन मार्फत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे गुन्हा नेमका कोणी दाखल करायचा ? याबाबत तालुका पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात संभ्रम असल्याचेही आढळून आले आहे त्यामुळेच याआधी घडलेल्या अनेक प्रकरणांमध्ये तक्रारी दाखल होण्यामध्ये दिरंगाई झाली आहे.
- तालुका पोलिसही ठेकेदारावर मेहेरबान?
- तक्रार करूनही कारवाई नाहीच HB
सातारा
सातारा-मेढा रस्त्यावर कोंडवे गावच्या हद्दीत एका खाजगी कंपनीची ओ.फ.सी.केबल बेकायदेशीररित्या विनापरवानगी टाकण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक होत आहे.उपविभागीय अभियंता इनामदार यांना कोणते ‘ईनाम’ मिळाल्याने कारवाईचे दार बंद केले आहे असाच सवाल येथील जनतेतून उपस्थित केला जात असून वरीष्ठ अधिकारी तरी या बेकायदेशीर खोदकामाची दखल घेणार का? याकडे लक्ष लागले आहे.
31/10/2022 रोजी मोळाचा ओढा ते कोंडवे परिसरात सातारा मेढा रस्त्यावर
संतोष इंजिनियरिंगचे प्रोप्रायटर भीमा राठोड यांच्यामार्फत बेकायदेशीरपणे ओ.फ.सी केबल टाकण्याचे काम सुरू होते.केबल टाकतेवेळी येथे करण्यात आलेले उत्खनन हे बेकायदेशीर असल्याची याबाबतची तक्रार शिवसेना उपशहर प्रमुख गणेश अहिवळे यांनी केली होती.
परंतु तेथे सुरू असलेल्या बेकायदेशीर कामावर उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्याकडून तीन दिवसानंतरही
कोणतीही कारवाई केली नसल्याचे आढळून आले आहे. तक्रार देऊनही बेकायदेशीर सुरू असलेल्या कामावर तेथे वापरण्यात आलेल्या वाहनांवर त्यात प्रामुख्याने ट्रक क्रं.एम.एच42एफ6696,
पाण्याचा टँकर ज्याचा क्रमांक एम.एच.12 ए.डब्ल्यू.6040 यासह पिकअप व पोकलेन या वाहनांसह खोदकाम करणारी मशीन अशा साहित्याचा वापर बेकायदेशीर खोदकाम करण्यासाठी आला होता. वापरण्यात आलेले साहित्य तात्काळ जप्त करून बेकायदेशीर केबल काढून टाकावी अशी मागणी केली होती.
बेकायदेशीररित्या उत्खनन व खोदकाम करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी तक्रारीनंतर आलेल्या प्रोजेक्ट व्यवस्थापक यांनी पाठवलेले सिक्युरिटी गार्ड दोन दिवस फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी तळ ठोकून घटनास्थळी उपस्थित होते.परंतु सातारा तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नाही.उलट सार्वजनिक बांधकाम विभागाने फिर्याद नोंदवावी असा जावई शोध लावला होता
आणि दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आढळून आले. - सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्री. इनामदार यांनी कोणतीही कारवाई न करता त्यांनी चालढकल केली असून त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शी आढळून आले आहे त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी गणेश अहिवळे यांनी निवेदनातून केली आहे
Related