कराड : मुंढे ग्रामपंचायतीच्या वतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये कराड सोसायटी मतदार संघातून विजय मिळाल्याबद्दल राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील व नवनिर्वाचित संचालिका ऋतुजा राजेश पाटील यांचा सत्कार करणेत आला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये कराड सोसायटी मतदार संघातून विजय मिळाल्याबद्दल राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन मुंढे ग्रामपंचायतीच्या वतीने शुभेच्छा दिल्या. तसेच लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, नवनिर्वाचित संचालिका ॠतुजा राजेश पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच आनंदराव जमाले, उपसरपंच सागर पाटील, संगम चेअरमन मधुकर जगदाळे, व्हा.चेअरमन महंमद आवटे, माजी चेअरमन भगवान पाटील, संचालक संभाजीराव साळवे, आनंदराव संकपाळ, राजेंद्र शिंदे, बा़ळकृष्ण जमदाडे, हणमंत सावंत, दादासो पाटील, मोहन यादव, सचिव महादेव माळी, ग्राम.सदस्य अशोक माळी, तंटामुक्ती अध्यक्ष बाजीराव चव्हाण, बाळासो साळवे, सुभाष एटम, भिमराव केंगार आदि मान्यवर उपस्थित होते.