पुणे दिनांक २७ ….
लोकशाही रुपी ‘स्वराज्याची सिंहगर्जना’ करणऱ्या व स्वातंत्र्य लढ्यात ‘केसरी वृत्तपत्र व पत्रकारीतेचे’ महत्व अधोरेखीत करणाऱ्या ‘टिळकांची लोकशाही प्रणीत भुमिका’ व ‘मोदींची हुकुमशाही प्रणीत वाटचाल’ हा परस्पर विरोघाभास असून, संविधानिक लोकशाही मुल्यांचा अवमान करणाऱ्या पंप्र मोदींना टिळक पुरस्काराने गौरवान्कीत करणे हा लोकमान्यांच्या (स्वातंत्र्य, स्वराज्य, निधर्मी राष्ट्रवाद व लोकशाही) मुल्यांचा अवमान असल्याची टिका प्रदेश काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
एकीकडे मोदी सरकार ‘स्वातंत्र्य भिकेत मिळाल्याची’ विधाने करणाऱ्यांना पदमश्री देऊन गौरव करते, सतत पाठीशी घालते, हीच मुळात टिळकांच्या स्वातंत्र्य लढ्याच्या प्रेरणेची थट्टा आहे. टिळकांच्या ध्येयास लोकमान्यता होती, त्यांचे राष्ट्रभक्ति’चे कार्य लोकांप्रती समर्पित होते, म्हणुनच त्यांना लोकमान्य पदवी बहाल केली गेली. काँग्रेसनेते लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेतून, महात्मा गांधींच्या नेतृत्वातील स्वातंत्र्याचा लढ़ा सलग पुढे चालवणारा हा काँग्रेस पक्षच आहे व त्यांचे नेते पं नेहरूं सह पटेल, मौलाना आझाद, बोस सह अनेकांनी त्याग, यातना व ब्रिटीशांकडुन वेळोवेळी कैदे’ची शिक्षा भोगली. मात्र स्वातंत्र्य सेनानी राहीलेल्या नेहरू – गांघी परीवाराची, काँग्रेस’च्या शहीद पंतप्रधानांची द्वेष व तिरस्कार भावनेने, मोदीजी वारंवार ऊपेक्षा करत आले आहेत. देशाचे पंतप्रधानजनतेने निवडुन दिलेल्या पर्यायी पक्षांच्या खासदारांवर भ्रष्टाचाराचे व देशद्रोहाचे तथ्यहिन व बेजबाबदार आरोप करतात, त्यांचे प्रश्नांना कस्पटा समान समजतात अशा पंप्र मोदी जीं ना त्यांच्या ‘कोणत्या लोकशाही प्रणीत देश हिताच्या कार्या बद्दल’ हा पुरस्कार दिला जात आहे(?) हा खेदजनक सवाल देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला. भाजपा विरोधात देशभर काँग्रेस’सह २५ पक्ष मोदींच्या ‘दमनशाही व हुकुमशाही’ विरोधात निकराची लढाई देत आहेत. मोदींच्या मनमानी कारभारामुळे, ऊद्योगपती मित्रांकरवी होत असलेल्या राष्ट्रीय संपत्तीच्या व बँकांच्या लुटीप्रती ‘त्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे’ देशाचे अपरिमित नुक़सान होत आहें. जाचक करवाढीने, जीवनावश्यक वस्तुंवर जीएसटी रुपी जिझीया कर लावून, जनतेस जीवघेण्या महागाईच्या खाईत ढकलून सर्वसामान्य, शेतकरी व गरीब जनतेचे जगणे कठीण केले जात आहे. अशा वादग्रस्त व आरोपग्रस्त मोदींना टिळक पुरस्कार देणे, हा ‘काँग्रेसने मोदीं- विरोधात देशभर उभारलेला लढ्याची थट्टा व उपहास’ आहे, अशी टिका देखील प्रदेश काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. आज देशात व राज्यात काँग्रेसजन ‘मोदींच्या अपयशाच्या विरोधात, चुकीच्या व देश-विधातक गैरकारभाराच्या विरोधात’ जिल्हा, तालुका ते गाव पातळीवर काँग्रेस चा कार्यकर्ता रस्त्यावर येऊन संघर्ष करीत आहे. काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांना जाणीव पुर्वक अडचणीत आणण्याची कट कारस्थाने मोदी-शहां कडुन वारंवार होत आहे, मात्र याचा यत्किंचित ही विचार डॅा रोहित टिळक परिवार व ‘बहु काँग्रेसजन’ असलेल्या ट्रस्टींनी’ केला नाही, ही काँग्रेसजनां करीता वेदनादायक बाब आहे, अशी पुस्ती ही त्यांनी जोडली. लोकमान्य टिळकांनी “ब्रिटीश हुकमशाही व गुलामगिरी विरोधात, ‘स्वराज्य माझा जन्म सिध्द अधिकार’ असल्याची सिंहगर्जना केली. पत्रकारीतेचा धर्म स्विकारुन दै केसरी’चे माध्यमातुन इंग्रजांचे विरोधात, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातु भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ऊभी केली. मात्र त्यावेळी मोदींच्या विचारधारेचे पुर्वज मात्र प्रत्यक्षात कुठे होते(?) असा ही प्रश्न त्यांनी केला..! राज्य सरकारें पाडापाडी करीत, विरोधी पक्षांच्या आमदारांची फोडापोडी करीत संविधानिक लोकशाहीची कुचेष्टा करण्याचे कार्य सत्ताधीश भाजप नेतृत्वा कडून सातत्याने होत आहे अशी टिका देखील काँग्रेस ने केली. गेल्या ७० वर्षात, “सर्वोच्च न्यायालयाने संविधानिक कर्तव्यां विषयी, राजधर्मा विंषयी ताशेरे मारलेल्या सरकारचे प्रमुख” म्हणुन मोदीजी हे ‘एकमेव टिळक पुरस्कारार्थी’ आहेत.. हे यादी पाहून स्पष्ट होते अशी पुस्ती ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी जोडली