कराड : शिवसेना कराड तालुक्यातील पदाधिकार्यांनी मुंबई येथे खा. संजय राऊत यांची भेट घेऊन कराड तालुक्यातील प्रलंबित प्रश्न व आगामी नगरपालिका व जिल्हापरिषद निवडणुकी संदर्भात सदिच्छा भेट घेतली.
आगामी काळात कोल्हापूर नाक्यावर होणारा उड्डाणपूल, दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज परिसराचे सुशोभीकरण, विविध गावातील पावसामुळे नुकसान झालेले पुल दुरूस्ती, राज्यमार्गांची रखडलेली कामे, पुरग्रस्तांचे पुनर्वसन असे विविध प्रश्न पदाधिकार्यांनी मांडले व कराड भेटीचे आमंत्रण दिले. यावेळी खा. राऊत यांनी आपण लवकरच कराडला भेट देणार असल्याचे सांगून शिवसेनेकडून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दव ठाकरे यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच आवाज उठवला आहे, त्यामुळे लोक शिवसेनेकडे एक सक्षम पर्याय म्हणून पहातात, असे प्रतिपादन नितीन बानुगडे पाटील यांनी केले. मा. आमदार दगडूदादा संपकाळ यांनी पक्षबाधंनी बाबत आढावा घेऊन शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची बांधणी अजून सक्षम करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी सातारा सांगली संपर्क प्रमुख व शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील, मा.आमदार दगडूदादा संपकाळ, कराड तालुका संपर्कप्रमुख संजय गायकवाड, उपजिल्हा प्रमुख रामभाऊ रैनाक, शिवसेना उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव, कराड नगरपालिकेचे मा. नगरसेवक प्रमोद वेर्णेकर, सातारा जिल्हा दक्षता समिती सदस्य राजेंद्र माने, जितूदादा सपकाळ, एकनाथ ओबंळे यांची प्रमुख उपस्थिती होती.